गोदरेज कॅपिटल, सेल्सफोर्स आणि डेलॉइट इंडिया यांच्यात धोरणात्मक सहकार्य; ग्राहकांना उत्कृष्ट डिजिटल कर्ज अनुभव देण्याचे उद्दिष्ट
डिजिटल ऑनबोर्डिंग, जोखीम व्यवस्थापन आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार
मुंबई, ११ जुलै २०२५: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची वित्तीय सेवा शाखा गोदरेज कॅपिटल आणि #१ एआय सीआरएम सेल्सफोर्स यांनी आज धोरणात्मक सहकार्याची घोषणा केली आहे. गोदरेज कॅपिटलच्या उपकंपन्यांच्या डिजिटल कर्ज देणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि भारतातील त्यांच्या ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी हे सहकार्य करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी डेलॉइट इंडिया अंमलबजावणी भागीदार म्हणून सहभागी करण्यात आले आहे, ज्यामुळे गोदरेज कॅपिटलच्या कर्ज देण्याच्या यंत्रणेत सेल्सफोर्सच्या प्रगत प्लॅटफॉर्मचे अखंड एकत्रीकरण सुलभ होते.
सहकार्याचे स्वरूप आणि फायदे:
सेल्सफोर्ससोबतचे हे सहकार्य भविष्याच्या दृष्टीने डिजिटल यंत्रणा तात्काळ स्वीकारणारी इकोसिस्टम तयार करण्यासाठी एक सामायिक दृष्टिकोन दाखवते. मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान परिवर्तने प्रदान करण्यातील डेलॉइटच्या सिद्ध कौशल्यासह, ही भागीदारी गोदरेज कॅपिटलच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ऑपरेशनल यंत्रणेला बढावा देण्यासोबतच, उत्तम ग्राहक अनुभव देईल आणि जोखीम ओळखण्याचे कौशल्य लक्षणीयरीत्या वाढवेल अशी अपेक्षा आहे.
या सहकार्याचा एक भाग म्हणून, कंपनी कर्जाच्या मूळ प्रणालीला (LOS) सर्वोत्तम-इन-क्लास एआय-चलित प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित करत आहे. तसेच, विद्यमान मुख्य ग्राहक संबंध व्यवस्थापन (CRM) प्लॅटफॉर्मसह कंपनीच्या सर्व उत्पादनांसाठी सेल्सफोर्सद्वारे समर्थित एआय-चलित प्लॅटफॉर्मची मदत घेतली जात आहे. या आधुनिक पायाभूत सुविधांमुळे कर्जाची प्रक्रिया अर्ज भरण्यापासून ते कर्ज मिळेपर्यंत अत्यंत सोपी होते. या सुधारणांचे उद्दिष्ट व्यक्ती तसेच उद्योगांना जलद सेवा देणे, प्रक्रियेतील अचूकता वाढवणे आणि क्रेडिट डिलिव्हरी मजबूत करणे हे आहे.
सेल्सफोर्सच्या एआय-चलित दृष्टिकोनाची मदत घेऊन, कंपनी कर्ज देण्याची डिजिटल प्रक्रिया अधिक अचूक करत आहे, ज्यामुळे स्मार्ट क्रॉस-सेलिंग धोरणांना पाठबळ मिळेल, जोखीम व्यवस्थापन अधिक अचूक होईल आणि ग्राहकांना उत्तम अनुभव मिळतील. उत्पादने, चॅनेल आणि टचपॉइंट्सवर ग्राहकांना संपूर्ण सेवा उपलब्ध करत कंपनी उत्तम ग्राहक सेवा, जलद ऑपरेशनल यंत्रणा आणि कमीत कमी मानवी हस्तक्षेप ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
भागीदारीवरील प्रतिक्रिया:
गोदरेज कॅपिटलचे एमडी आणि सीईओ मनीष शाह म्हणाले, “एआय-चलित प्लॅटफॉर्ममध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या सेल्सफोर्ससोबतचे आमचे सातत्यपूर्ण सहकार्य आमच्या तंत्रज्ञान-प्रथम दृष्टिकोनाला पूरक असेच आहे. यामुळे आम्हाला अधिक स्मार्ट क्रेडिट अनुभव देणे, ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारणे आणि वैयत्तिकरणासाठी नवीन संधी निर्माण करणे शक्य होते. वित्तीय सेवांमधील आव्हाने सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर आणि अधिक सर्वसमावेशक, जलद कर्ज परिसंस्थेद्वारे भारताच्या व्यापक आर्थिक वाढीला पाठिंबा देण्यावरील आमचे सामायिक लक्ष ही भागीदारी प्रतिबिंबित करते.”
सेल्सफोर्स - दक्षिण आशियाच्या अध्यक्षा आणि सीईओ अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, “गोदरेज कॅपिटल एक धाडसी नवोन्मेषक म्हणून उभे आहेत. त्यांच्या ग्राहक-प्रथम दृष्टिकोनाला ते डिजिटल-प्रथम या आजच्या गरजेसह एकत्र करत आहेत. केवळ भारतातील एमएसएमईसाठीच नव्हे तर देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रत्येक कर्जदार, उद्योजक आणि कुटुंबासाठी क्रेडिट डिलिव्हरी पुनर्परिभाषित करत आहेत. या सर्वसमावेशक वाढीसाठी डेटा, बुद्धिमत्ता आणि गती एकत्र आणणाऱ्या एकात्मिक, एआय-संचलित प्लॅटफॉर्मसह त्यांच्या प्रवासाला पाठिंबा देण्याचा आम्हाला अभिमान आहे.”
डेलॉइट इंडियाचे पार्टनर अश्विन बल्लाळ म्हणाले, "या महत्त्वाकांक्षी परिवर्तनासाठी गोदरेज कॅपिटलसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होतो आहे. गोदरेज कॅपिटलच्या डिजिटल-फर्स्ट व्हिजनसह सेल्सफोर्सच्या एआय-नेतृत्वाखालील प्लॅटफॉर्मचे एकत्रीकरण भारतातील कर्ज देण्याचा अनुभव सुखद करण्यासाठी एक संधी देते आहे."
गोदरेज कॅपिटल उत्तम दर्जाचे आणि भविष्यासाठी तयार अशा तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत आहे. कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांच्या इन-हाऊस टीम्स विविध कामांमध्ये GenAI च्या उपायांची मदत घेत आहेत. तसेच, कंपनीचे एंटरप्राइझ-ग्रेड GenAI आणि ML प्लॅटफॉर्म SAKSHAM देखील AI विकासाचे केंद्रीकरण करते, ज्यामुळे सुरक्षित LLM एकत्रीकरण सक्षम होते आणि विकसित होत असलेल्या BFSI लँडस्केपसाठी उत्तम, ग्राहक-केंद्रित उपाय सुचवते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: