सीडीएसएल आयपीएफतर्फे संपूर्ण भारतात आर्थिक साक्षरतेचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी बहुभाषिक गुंतवणूकदार जनजागृती प्लॅटफॉर्म सुरू
१२ भाषांमध्ये उपलब्ध असलेला हा ऑनलाइन स्रोत गुंतवणूकदारांना शिक्षित करणार; 'सेबी'चे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांच्या हस्ते अनावरण
'ज्ञानाच्या माध्यमातून सक्षमीकरण हाच खरा आर्थिक समावेश': सुधीश पिल्लई, सीडीएसएल आयपीएफ सेक्रेटरीएट
मुंबई, १० जुलै २०२५: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL)च्या गुंतवणूकदार संरक्षण निधी म्हणजेच इनव्हेस्टर प्रोटेक्शन फंड (CDSL IPF)ने संपूर्ण भारतात आर्थिक साक्षरतेचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी एका नवीन बहुभाषिक गुंतवणूकदार जनजागृती प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आहे. हा एक सर्वसमावेशक ऑनलाइन स्रोत असून, १२ भाषांमध्ये उपलब्ध आहे. या वेबसाइटची रचना सिक्युरिटीज मार्केटमधील संकल्पना सोप्या करून मांडण्यासाठी आणि जबाबदार गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली आहे.
प्लॅटफॉर्मचे अनावरण व वैशिष्ट्ये:
या वेबसाइटचे अनावरण सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)चे अध्यक्ष श्री. तुहिन कांता पांडे यांच्या हस्ते ७ जुलै २०२५ रोजी CDSL आणि NSDLच्या इनव्हेस्टर अॅपमध्ये ई-व्होटिंग यंत्रणेवर प्रॉक्सी अॅडव्हायजर रेकमेंडेशन्सच्या सादरीकरणावेळी करण्यात आले.
CDSL IPF वेबसाइटचे सादरीकरण हे आर्थिक साक्षरता उंचावणे आणि गुंतवणूकदार सहभागाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या प्लॅटफॉर्मचा लाभ शहरी, तसेच ग्रामीण भागांतील संभाव्य गुंतवणूकदारांपासून ते प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांपर्यंत सर्वांना मिळणार आहे. आजच्या गुंतवणूकदारांच्या बदलत्या गरजा ओळखून वापरकर्ते या प्लॅटफॉर्मवर सर्वसामान्य समजतील अशा सोप्या, सरळ भाषेत लिहिलेले लेख, सूची लेख (लिस्टिकल्स) आणि माहितीपूर्ण इन्फोग्राफिक्ससारख्या विविध प्रकारांमधून माहिती मिळवू शकतात. सुरुवातीपासूनच हा प्लॅटफॉर्म इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू, उडीया आणि पंजाबी या १२ भाषांमध्ये समृद्ध आणि वैविध्यपूर्ण माहिती देत असून, त्यायोगे विविध भाषिक लोकसमूहांसाठी सर्वसमावेशक प्रवेश आणि सहभाग सुनिश्चित करत आहे.
CDSL IPF सेक्रेटरीएटचे मत:
सादरीकरणाप्रसंगी बोलताना CDSL IPF सेक्रेटरीएटचे श्री. सुधीश पिल्लई म्हणाले, “खऱ्या अर्थाने आर्थिक समावेशन म्हणजे केवळ प्रवेश मिळणे, अॅक्सेस करता येणे नव्हे, तर ज्ञानाच्या माध्यमातून सक्षमीकरण होणे हा आहे, असे आम्हाला वाटते. हा उपक्रम गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास बळकट करतो, माहितीपूर्ण निर्णय घेण्यास प्रवृत्त करतो आणि आत्मनिर्भर गुंतवणूकदार घडविण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.”
हा प्लॅटफॉर्म विनामूल्य उपलब्ध असून, नियमितपणे नवीन आशय आणि माहितीसह अपडेट केला जाईल. गुंतवणूकदार या स्रोताचा लाभ घेण्यासाठी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: