बसमध्ये चोऱ्या करणारा अट्टल गुन्हेगार वानवडी पोलिसांच्या जाळ्यात; ३.५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

 


 पुणे, १२ जुलै २०२५: पुणे शहर पोलिसांच्या वानवडी पोलीस स्टेशनने बसमध्ये विविध ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला ११ जुलै २०२५ रोजी जेरबंद केले आहे.  त्याच्याकडून ,५१,०००/- रुपये किमतीच्या चार तोळे वजनाच्या सोन्याच्या तीन बांगड्या जप्त करण्यात आल्या आहेत.  

वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकाचे उपनिरीक्षक धनाजी टोणे हे स्टाफसह  पेट्रोलिंग करत होते.  त्यावेळी पोलीस अंमलदार अमोल पिलाणे विष्णू सुतार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, एक संशयित इसम शिंदेवस्ती, कॅनॉलजवळ या भागात फिरत असून तो 'सोन्याचे दुकान कोठे आहे' 'जुने सोने विकायचे आहे' अशी विचारपूस करत आहे आणि त्याच्याकडे काहीतरी संशयित वस्तू आहे.  

मिळालेल्या माहितीच्या आधारे, उपनिरीक्षक धनाजी टोणे यांनी स्टाफसह तात्काळ घटनास्थळी जाऊन संशयित इसमाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव चंद्रकांत राजू जाधव (वय ३१ वर्षे, धंदा मजुरी, रा. .नं. ३६, सर्वोदय कॉलनी, जमाल बाबा दर्ग्याच्या पाठीमागे, मुंढवा, पुणे) असे सांगितले. त्याच्या अंगझडतीदरम्यान, तोळे वजनाच्या सोन्याच्या तीन बांगड्या आढळल्या.  दागिन्यांबाबत विचारणा केली असता, त्याने पीएमटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशांच्या हातातील तीन बांगड्या चोरी केल्याची कबुली दिली.  

वानवडी पोलीस ठाणेकडील अभिलेखाची पडताळणी केली असता, चंद्रकांत राजू जाधव याच्यावर वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गु..नं. २६१/२०२५, भा.न्या.सं.. ३०३() गु..नं. २७९/२०२५, भा.न्या.सं.. ३०९() प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली.  यामुळे त्याने गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.  

 या आरोपीवर वाकड पोलीस स्टेशनमध्ये ०१, सांगवी पोलीस स्टेशनमध्ये ०२, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये ०२, निगडी पोलीस स्टेशनमध्ये ०१, मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये ११ आणि वानवडी पोलीस स्टेशनमध्ये ०२ असे एकूण अनेक गुन्हे दाखल आहेत.     

Bus Theft, Chain Snatching, Pune Crime, Serial Offender, Police Arrest 

#PunePolice #BusTheft #WanwadiPolice #CrimeNews #GoldRecovery



बसमध्ये चोऱ्या करणारा अट्टल गुन्हेगार वानवडी पोलिसांच्या जाळ्यात; ३.५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त बसमध्ये चोऱ्या करणारा अट्टल गुन्हेगार वानवडी पोलिसांच्या जाळ्यात; ३.५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त Reviewed by ANN news network on ७/१३/२०२५ ०३:२९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".