पुणे शहर : पुणे गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका जुन्या घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अंगदसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय ४१, रा. गाडवे कॉर्नर, वृंदावन पॅलेस, थेऊर फाटा, पुणे) याला वानवडी परिसरातून अटक केली आहे. हा आरोपी २०१ ९ पासून फरार होता.
गुन्हे शाखा युनिट ३ मधील अधिकारी व कर्मचारी ३० जून रोजी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार बोडरे व शिरोळकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुरनं ३३१/२०१९ भारतीय दंड संहिता कलम ४५४, ३८० या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अंगदसिंग कल्याणी हा वानवडी परिसरात आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ रामटेकडी येथील कोठारी शोरूम बाजुच्या गल्लीमध्ये जाऊन शोध घेतला असता, संशयित आरोपी अंगदसिंग कल्याणी पोलिसांना आढळून आला. त्याला त्वरित ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने जुन्या घरफोडीच्या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याची कबुली दिली.
ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट ३ येथील वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पौळ, निरीक्षक संदीप घोरपडे, अंमलदार संतोष बोबडे, विल्सन डिसोझा, किरण गायकवाड, अतुल साठे, प्रकाश कडाळे, अनिल पटेल, ज्ञानेश्वर सोळंके, रोहित कानडे, गणेश गनाचारे, सोपान बोडरे, विशाल शिराळे, विठ्ठल खोल्लम, अतुल साळुंखे, कैलास साळुंखे आणि ऋषीकेश रणदिवे यांनी केली.
Burglary, Arrest, Pune Crime, Crime Branch, Pune Police, Fugitive
#PunePolice #CrimeBranch #BurglaryArrest #Fugitive #PuneCrime #LawEnforcement

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: