पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक मोहीम; शहरात ड्रग्सविरोधात कारवाई तीव्र
पुणे शहर: पुणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी रास्ता पेठ परिसरात मोठी कारवाई करत मेफेड्रोन (एम.डी.) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून ३ लाख ७३ हजार ४०० रुपये किमतीचे १८ ग्रॅम ६७ मिलीग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस स्टेशन येथे गुरनं १४६/२०२५, एन.डी.पी.ए. ॲक्ट कलम ८ (क), २२ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे अधिकारी व अंमलदार हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना, उंटाड्या मारुती मंदिराच्या पाठीमागे, के.एम. हॉस्पिटल वॉल कंपाऊंड भिंतीजवळ, त्रिमुर्ती कॉम्प्लेक्स समोर, सार्वजनिक रोडवर, रास्ता पेठ, पुणे येथे आकिब अशफाक शेख (वय २८ वर्षे, रा. एस.आर.ए. पत्र्याची चाळ, होबे हॉस्पिटल समोर, ए.डी. कॅम्प चौक, भवानी पेठ, पुणे) हा संशयितरित्या उभा असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी आकिब शेखची झडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये ३ लाख ७३ हजार ४०० रुपये किमतीचे १८ ग्रॅम ६७ मिलीग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळून आला. सदर मालासह मोबाईल व इतर असा एकूण ३ लाख ७८ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपी आकिब शेखला या गुन्ह्यात तात्काळ अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (आर्थिक व सायबर, अति. कार्य गुन्हे) श्री. विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर येथील पोलीस अंमलदारांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. पुणे पोलिसांकडून अंमली पदार्थांच्या विरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
Narcotics, Drug Seizure, MD Drug, Pune Police, Anti-Narcotics Cell, Rasta Peth, Crime
#PunePolice #DrugBust #MDDrug #Narcotics #CrimeNews #RastaPeth #AntiDrugOperation

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: