१९ जुलै रोजी 'कलारंग' गानमैफल; शुभदा देशपांडे करणार शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताची रंगतदार प्रस्तुती
या मैफलीमध्ये ज्येष्ठ गायिका शुभदा देशपांडे शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, भावगीत, नाट्यगीत आणि भजनांची रंगतदार प्रस्तुती सादर करणार आहेत. त्यांना माधव लिमये (संवादिनी), सौरभ गुळवणी (तबला), आणि विनायक दीक्षित, ओंकार जोशी (तालवाद्य) हे निपुण कलाकार साथसंगत करणार आहेत.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत सादर केला जाणारा 'कलारंग' हा २५३ वा कार्यक्रम असून, पुण्यातील रसिकांसाठी हा एक संगीतविषयक बहारदार अनुभव ठरणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी खुला असल्याची माहिती प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.
#Kalarang #PuneEvents #MusicConcert #ClassicalMusic #IndianClassical #Bhavgeet #Natyageet #Bhajan #ShubhadaDeshpande #BharatiyaVidyaBhavan #InfosysFoundation #PuneCulture #FreeEvent #LiveMusic

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: