बांगलादेशी घुसखोर महिलेला अटक

पुणे: फरासखाना पोलिसांनी एका बांगलादेशी महिलेला अवैधरित्या भारतात वास्तव्यास असताना अटक केली आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ती पुण्यात बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही कारवाई पोलीस उप-आयुक्त परिमंडळ , पुणे शहर, श्री.  कृषिकेश रावले यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.  

मिळालेल्या माहितीनुसार, फरासखाना .टी.सी.  पथकातील पोलीस अंमलदार विशाल शिंदे आणि वसिम शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील रेड लाईट एरिया, बुधवार पेठ, पुणे येथे एक बांगलादेशी महिला अवैधरित्या राहत आहे.  ही महिला तीन महिन्यांच्या व्हिसावर भारतात फिरण्यासाठी आली होती, मात्र व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ती बांगलादेशात परत गेली नव्हती.  

क्रांती चौक हॉटेलजवळ, बुधवार पेठ, पुणे येथे ही महिला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, फरासखाना पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ही माहिती कळवण्यात आली.  त्यांच्या आदेशानुसार क्रांती हॉटेलजवळ, बुधवार पेठ, पुणे येथे छापा टाकून रीना बेगम मोहम्मद मिलन मिया (वय ३०, रा. ग्वालघाट लेन, पोस्ट ढाका, थाना सुत्रापूर, ढाका दक्षिण सिटी कॉर्पोरेशन ढाका, ११०० देशबांगलादेश) या महिलेला ताब्यात घेण्यात आले.  

चौकशीदरम्यान, रीना बेगम हिने सांगितले की ती सन २०१८ मध्ये पासपोर्टसह तीन महिन्यांच्या व्हिसावर भारतात फिरण्यासाठी आली होती. भारतात आल्यानंतर तिचा व्हिसा संपला, तरीही ती अवैधरित्या लपूनछपून राहत होती.  बुधवार पेठ, पुणे येथे ती स्वेच्छेने वेश्याव्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असल्याचेही समोर आले आहे.  बांगलादेशी रहिवासी असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर या महिलेला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.  

ही कामगिरी निरीक्षक (गुन्हेउत्तम नामवाडे,  अजित जाधव, सहायक निरीक्षक  वैभव गायकवाड, अंमलदार विशाल शिंदे, वसिम शेख, नितीन जाधव, गजानन सोनुने, इसाक पठाण, सावंत कांबळे, भोईटे, बेंद्रे, कवटे यांनी पार पाडली.  


Crime News, Pune Police, Illegal Immigrants

 #PuneCrime #IllegalImmigration #BangladeshiNational #FaraskhanaPolice #ProstitutionRaid #PuneNews


बांगलादेशी घुसखोर महिलेला अटक बांगलादेशी घुसखोर महिलेला अटक Reviewed by ANN news network on ७/२६/२०२५ ०४:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".