पुणे: पुणे शहर पोलिसांनी लष्कर आणि कोंढवा परिसरात घरफोड्या करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे लष्कर पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे. या आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्यांच्यावर यापूर्वीही पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १५
जुलै २०२५ रोजी
अदिती बिझनेस ग्राउंड फ्लोअर,
कॅम्प, पुणे येथील
युनियन बँक ऑफ
इंडियामध्ये तसेच युनियन बँकेशेजारील ऑफिसमध्ये अनोळखी
व्यक्तीने खिडकी उघडून आत
प्रवेश करत चोरीचा
प्रयत्न केला होता. त्यांनी आतील ड्रॉवर आणि
कपाट उघडून कागदपत्रे अस्ताव्यस्त केली
होती आणि तिजोरी
खिडकीत उचलून ठेवली
होती. या प्रकरणी लष्कर
पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा
दाखल करण्यात आला
होता.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान, लष्कर
पोलीस स्टेशनच्या तपास
पथकातील पोलीस अधिकारी आणि
अंमलदार यांनी घटनास्थळावरील तसेच
लष्कर ते फुरसुंगी दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज
तपासले. पोलीस अंमलदार लोकेश
कदम आणि सागर
हराळ यांनी तांत्रिक विश्लेषण करून
गुन्ह्यात वापरलेले वाहन शोधून काढले.
त्यानंतर मिळालेल्या गुप्त
माहितीच्या आधारे रामटेकडी, हडपसर
आणि फुरसुंगी परिसरात सापळा
रचून आरोपींना अटक
करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
आर्यन अजय माने
उर्फ मॉन्टी (वय
२१, रा. खुटवड
चौक, हरपळे वस्ती,
फुरसुंगी), विशाल मारुती आचार्य
(वय २५, रा.
आनंद नगर, रामटेकडी) आणि
ओमकार सुरेश गोसावी
(वय २२, रा.
मुक्ताई रेसिडेन्सी, फुरसुंगी) अशी आहेत. यापैकी आर्यन अजय
माने उर्फ मॉन्टी
आणि ओमकार सुरेश
गोसावी हे पुणे
शहरातील पोलीस अभिलेखावरील सराईत
चोर आणि घरफोडी
करणारे गुन्हेगार आहेत.
त्यांच्यावर हडपसर,
वानवडी, लोणीकंद पोलीस
स्टेशनमध्येही
अनेक चोरी आणि
घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
तपासात आरोपींनी लष्कर
आणि कोंढवा परिसरात घरफोडी
केल्याचे निष्पन्न झाले आहे. लष्कर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध आणखी
एक गुन्हा दाखल
करण्यात आला असून, कोंढवा
पोलीस ठाण्यातही त्यांच्यावर गुन्हा
नोंद करण्यात आला
आहे. आरोपींकडून लष्कर
पोलीस स्टेशनकडील गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत
करण्यात आला आहे.
ही कामगिरी सहा. निरीक्षक विशाल
दांडगे, उप निरिक्षक राहुल
घाडगे आणि अंमलदार महेश कदम, अतुल
मेंगे, सोमनाथ बनसोडे,
रमेश चौधर, प्रविण
गायकवाड, प्रमोद गायकवाड, अमोल
चव्हाण, लोकेश कदम,
सागर हराळ व
अमोल कोडीलकर यांनी
पार पाडली.
Crime News, Pune Police, Burglary Arrests
#PuneCrime #BurglaryArrest #LashkarPolice #KondhwaPolice #PunePoliceAction #CriminalsArrested
Reviewed by ANN news network
on
७/२६/२०२५ ०४:४३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: