पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या सराईत आरोपीला अटक

 


पुणे, ०९ जुलै २०२५: पुणे गुन्हे शाखेच्या युनिट- ने पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली आहे.  मोहम्मद राजु इराणी (वय ३१, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ,५६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  या कारवाईमुळे वाघोली आणि शिरूर पोलीस स्टेशनमधील गुन्हे उघडकीस आले आहेत.   

 दिनांक ०८ जुलै २०२५ रोजी युनिट , गुन्हे शाखेकडील सहाय्यक निरीक्षक मदन कांबळे आणि अंमलदार लोणी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, अंमलदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की, ज्येष्ठ नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करून लुटणारा रेकॉर्डवरील आरोपी मोहम्मद राजु इराणी हा एमआयटी कॉर्नर या ठिकाणी येणार आहे.   

 या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तातडीने एमआयटी कॉर्नर येथे सापळा रचून आरोपी मोहम्मद राजु इराणीला होंडा शाईन मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने इतर साथीदारांसह वाघोली पोलीस स्टेशन गु..नं. ३३/२५, भा.न्या.सं.  ३०q(8), () आणि शिरूर पोलीस स्टेशन गु..नं. ४५६/२५, भा.न्या.सं.  २०४, ३१६ (), ३१८ (), () हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून ,००,०००/- रु. किमतीची होंडा शाईन एस.पी. मोटारसायकल आणि ५६,०००/- रु. किमतीची ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण ,५६,०००/- रु.  किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.   

ही  कामगिरी युनिट- गुन्हे शाखेचे निरीक्षक अजय वाकचौरे, सहाय्यक निरीक्षक मदन कांबळे,  अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, रमेश चौधर, अनिल घाडगे, नितीन धाडींग, बाळासाहेब सकट, सचिन पवार, मच्छिंद्र वाळके, सुहास तांबेकर, अमोल पवार, अक्षय घोरपडे, प्रतीक वाघमारे, स्वप्नील गायकवाड, ज्योती काटकर, मनिषा पुंडे यांनी केली.  

 Crime, Fraud, Robbery, Senior Citizen Safety, Pune Police



पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या सराईत आरोपीला अटक पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या सराईत आरोपीला अटक Reviewed by ANN news network on ७/११/२०२५ ०९:५७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".