पुणे,
०९ जुलै २०२५:
पुणे गुन्हे शाखेच्या
युनिट-६ ने
पोलीस असल्याची बतावणी
करून ज्येष्ठ नागरिकांना
लुटणाऱ्या एका सराईत
आरोपीला अटक केली
आहे.
दिनांक ०८ जुलै २०२५ रोजी युनिट ६, गुन्हे शाखेकडील सहाय्यक निरीक्षक मदन कांबळे आणि अंमलदार लोणी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, अंमलदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की, ज्येष्ठ नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करून लुटणारा रेकॉर्डवरील आरोपी मोहम्मद राजु इराणी हा एमआयटी कॉर्नर या ठिकाणी येणार आहे.
या
माहितीच्या आधारे, पोलिसांनी तातडीने
एमआयटी कॉर्नर येथे सापळा
रचून आरोपी मोहम्मद
राजु इराणीला होंडा
शाईन मोटारसायकलसह ताब्यात
घेतले.
ही कामगिरी युनिट-६ गुन्हे शाखेचे निरीक्षक अजय वाकचौरे, सहाय्यक निरीक्षक मदन कांबळे, अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, रमेश चौधर, अनिल घाडगे, नितीन धाडींग, बाळासाहेब सकट, सचिन पवार, मच्छिंद्र वाळके, सुहास तांबेकर, अमोल पवार, अक्षय घोरपडे, प्रतीक वाघमारे, स्वप्नील गायकवाड, ज्योती काटकर, मनिषा पुंडे यांनी केली.
Crime, Fraud, Robbery, Senior Citizen Safety, Pune Police

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: