पुणे, ११ जुलै २०२५: बाणेर पोलीस स्टेशनने पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्यांना जेरबंद करून ५ लाख ४३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे घरफोडीचे आणि जबरी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
बाणेर येथील
मुक्ता रेसिडेन्सी, पीएमटी
बस स्टॉपजवळ, सुतारवाडी, पाषाण
येथे ७ जून
२०२५ ते ९
जून २०२५ या
कालावधीत एका फ्लॅटमध्ये अज्ञात
चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून ५,४३,५००/- रुपये
किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने
आणि रोकड लंपास
केली होती. याप्रकरणी बाणेर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय
न्याय संहिता कलम
३३१ (३), ३३१
(४), ३०५ नुसार
गुन्हा दाखल करण्यात आला
होता.
या गुन्ह्याचा तपास
करत असताना, बाणेर
पोलीस स्टेशनच्या तपास
पथकाने सीसीटीव्ही फुटेजची कसून
तपासणी केली. कोणताही ठोस पुरावा नसतानाही, सीसीटीव्हीमधील आरोपींच्या शारीरिक रचनेवरून संशयित
आरोपी शाहरुख फारुख
शेख (वय २१,
रा. बापु काटे
चाळ रुम, पवारवस्ती, दापोडी,
पुणे) याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने
आपले साथीदार गुलफान
नफिस अन्सारी उर्फ
शेख (वय १९,
रा. राजा वाईन्सच्या मागे,
सिद्धार्थ नगर, दापोडी, पुणे)
आणि अर्जुन
गणपत गायकवाड (वय
१९, रा. तरवड
वस्ती कांजारभट, घुले
यांचे मैदान, हडपसर,
पुणे) यांच्यासह गुन्हा
केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून फिर्यादींच्या चोरीस
गेलेल्या मालापैकी ८०.४२२ ग्रॅम
सोन्याचे दागिने, चोरीच्या पैशांतून खरेदी
केलेली एक दुचाकी
आणि दोन मोबाईल
फोन जप्त करण्यात आले
आहेत. तसेच, बाणेर
पोलीस स्टेशनमधील गु.र.नं. १४४
भा.न्या.सं.
कलम ३०३
(२) नुसार दाखल
असलेल्या गुन्ह्यातील चोरीस गेलेली पल्सर
१२० गाडीही या
आरोपींकडून जप्त करण्यात आली
आहे.
याशिवाय, बाणेर
पोलीस स्टेशनमध्ये दाखल
गुन्हा १४१/२०२५
भा.न्या.सं.
कलम ३०८(४), ३(४)
मधील आरोपी सनी
गौतम खंडागळे (वय
२०, रा. भेगडे
आळी, घोरवडी रेल्वे
स्टेशन रोड, ताळेगाव दाभाडे,
ता. मावळ, जि.
पुणे) आणि कार्तिक भाऊ
पोटफोडे (वय १८, रा.
डी विंग-१०५,
मंत्रा सिटी, ताळेगाव दाभाडे,
ता. मावळ, जि.
पुणे) यांना अटक
करून त्यांच्याकडून फिर्यादीचा जबरीने
काढलेला मोबाईलही जप्त करून गुन्हा
उघडकीस आणण्यात आला
आहे.
ही
कामगिरी बाणेर
पोलीस ठाणेचे वरिष्ठ निरीक्षक, चंद्रशेखर सावंत, सपोनि के.बी. डाबेराव, पोउपनि
संदेश माने, अंमलदार बाबा आहेर, किसन
शिंगे, आप्पा गायकवाड, संदेश
निकाळजे, अतुल इंगळे, गजानन
अवातिरक, प्रदीप खरात, प्रीतम
निकाळजे, शरद राऊत, विकास
भोरे, रोहित पाथरुट
यांनी केली आहे.
Crime, Robbery, Burglary, Pune Police
#PunePolice #BanerPolice
#CrimeNews #BurglaryArrest #TheftSolved

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: