पुणे, ११ जुलै २०२५: मौजमजा करण्यासाठी महागड्या मोटारसायकली चोरून त्या 'फेसबुक मार्केटप्लेस'वर ऑनलाइन विकणाऱ्या एका पदवीधर आरोपीला गुन्हे शाखा युनिट ०५, पुणे शहर, यांनी जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे एकूण ८ लाख ४० हजार रुपये किमतीच्या १४ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, हडपसर, काळेपडळ, चिखली (पिंपरी चिंचवड) आणि सांगवी (पिंपरी चिंचवड) पोलीस स्टेशनमधील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
दिनांक
०२ जुलै २०२५
रोजी गुन्हे शाखा
युनिट ०५ पुणे
शहर पथकाकडील उपनिरीक्षक अभिजीत
पवार आणि स्टाफ,
निरीक्षक संजय पतंगे
यांच्या सूचनेप्रमाणे गोपनीय बातमीच्या आधारे
संशयित महादेव शिवाजी
गरड (वय २६
वर्षे, सध्या रा.
समर्थ कृपा बिल्डींग, कल्याणी शाळेजवळ, मांजरी
बुद्रुक, पुणे. मूळ रा.
मू. पो. अंबुलगा, ता.
चाकूर, जि. लातूर)
याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून होंडा
सी.बी. शाईन (क्रमांक MH-१५/GH/९१४८) आणि युनिकॉर्न (क्रमांक MH-११/CT/२९१४) अशा दोन
चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
कसून चौकशी केली
असता, त्याने आणखी
काही होंडा कंपनीच्या युनिकॉर्न मोटारसायकली चोरल्याची कबुली
दिली. तसेच, त्याने
मोबाईलच्या 'फेसबुक मार्केटप्लेस'वरील
जाहिरातींवरून
मोटारसायकलचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीने मोटारसायकली ओढल्या
असल्याचे लोकांना खोटे कारण सांगून
विकल्याचे सांगितले.
गोपनीय माहिती
काढून संबंधित व्यक्तींकडे चौकशी
केल्यानंतर, १२ युनिकॉर्न मोटारसायकली आणि
आरोपीच्या ताब्यात असलेल्या ०२ मोटारसायकली, अशा
एकूण १४ दुचाकी
वाहने हस्तगत करण्यात आली.
महादेव शिवाजी
गरड हा पदवीधर
असून, मौजमजा करण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने त्याने
दुचाकी वाहने चोरून
ती लोकांना खोटे
कारण सांगून विकल्याचे निष्पन्न झाले
आहे.
या कारवाईमुळे हडपसर
पोलीस स्टेशनकडील ०६,
काळेपडळ पोलीस स्टेशनकडील ०३,
चिखली पोलीस स्टेशन
(पिंपरी चिंचवड) कडील
०२, आणि सांगवी
पोलीस स्टेशन (पिंपरी
चिंचवड) कडील ०३
असे एकूण १४
वाहनांच्या चोरीचे गुन्हे उघडकीस
आले आहेत.
ही कामगिरी युनिट ५ गुन्हे
शाखाचे निरीक्षक संजय पतंगे, उपनिरीक्षक अभिजीत
पवार,अंमलदार विनोद
शिवले, प्रताप गायकवाड, विनोद
निंभोरे, अमित कांबळे, अकबर
शेख, राजस शेख,
प्रमोद टिळेकर, शहाजी
काळे, पृथ्वीराज पांडुळे, स्वाती
तुपे, पल्लवी मोरे,
तानाजी देशमुख, राहुल
ढमढेरे, अविनाश इंगळे,
प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे,
अमर चव्हाण, नासिर
देशमुख व नेत्रिका अडसुळ
यांनी ेकेली.
Crime, Vehicle Theft, Online Fraud, Pune Police
#PunePolice #BikeTheft #OnlineScam #CrimeUnit5 #VehicleRecovery

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: