पिंपरी-चिंचवड, २ जुलै २०२५: पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात महाराष्ट्रातील एकमेव 'वेस्ट टू वंडर वर्ल्ड' थीम पार्क साकारले जात आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पात जगातील सात आश्चर्यांसह इतर ऐतिहासिक वास्तूंची प्रतिकृती 'टाकाऊपासून टिकाऊ' वस्तूंचा वापर करून बनवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हे थीम पार्क आकारास येत आहे.
या थीम पार्कमध्ये एकूण १७ ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती असतील. यात जगातील सात आश्चर्य असलेल्या ताजमहाल, आयफेल टॉवर, बुर्ज खलिफा, लीनिंग टॉवर ऑफ पिसा, सिडनी ऑपेरा हाऊस, अजंठा लेणी, ला सागराडा फॅमिलीया, चिचेन इत्झा, पिरॅमिड ऑफ गिझा, पेट्रा ऑफ जॉर्डन, कोलोसियम ऑफ रोम, बिग बेन ऑफ लंडन, अंकोर वट ऑफ कंबोडिया, हंपी चारियट, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ट्रेव्ही फाउंटन आणि माऊंट रशमोर यांचा समावेश असेल.
या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ११.०२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे थीम पार्क पूर्ण झाल्यावर पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात भर पडेल आणि ते महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनेल, यात शंका नाही.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत आणि कामाच्या पाहणीवेळी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे थीम पार्क लवकरच पूर्ण होऊन नागरिकांसाठी खुले होणार आहे.
Theme Park, Pimple Saudagar, Pimpri Chinchwad, Waste to Wonder, Tourism, Maharashtra, Ajit Pawar, Urban Development
#PimpleSaudagar #WasteToWonder #ThemePark #PimpriChinchwad #MaharashtraTourism #AjitPawar #PCCMC #UrbanDevelopment

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: