'मार्क्स आणि विवेकानंद' पुस्तकाचे प्रकाशन ४ जुलै रोजी पुण्यात

 


पुणे, २ जुलै २०२५: विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी) च्या मराठी प्रकाशन विभाग आणि विवेकानंद केंद्र पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 'मार्क्स आणि विवेकानंद (एक तौलनिक अध्ययन)' या महत्त्वपूर्ण पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, ४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता सदाशिव पेठेतील भारतीय इतिहास संशोधक मंडळ येथे पार पडेल.

या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी भूषवणार आहेत. 'चाणक्य मंडळ' चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील, तर अभिजीत जोग हेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

'मार्क्स आणि विवेकानंद' या पुस्तकाचे मूळ लेखक स्व. पी. परमेश्वरन आहेत, तर याचा मराठी अनुवाद स्व. चं. प. भिशीकर यांनी केला आहे. विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी) च्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर आणि विवेकानंद केंद्र पुणे शहर संचालक माधव जोशी यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Book Launch, Pune Event, Marxism, Vivekananda, Cultural Event, Philosophy, Vivekand Kendra

 #MarxAndVivekananda #BookLaunch #PuneEvents #VivekanandaKendra #Philosophy #MadhavBhandari #AvinashDharmadhikari #CulturalProgram

'मार्क्स आणि विवेकानंद' पुस्तकाचे प्रकाशन ४ जुलै रोजी पुण्यात 'मार्क्स आणि विवेकानंद' पुस्तकाचे प्रकाशन ४ जुलै रोजी पुण्यात Reviewed by ANN news network on ७/०२/२०२५ ०३:४०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".