कृषी दिनानिमित्त सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे यांच्या हस्ते कै. नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. पुष्पा पाटील, कृषिविद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर, कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, कीटक शास्त्रज्ञ डॉ. वैशाली सावंत, कनिष्ठ भात पैदासकार डॉ. महेंद्र गवई, कनिष्ठ कृषिविद्यावेत्ता डॉ. नामदेव म्हसकर, कनिष्ठ संशोधन सहायक डॉ. राजेंद्र सावळे, कृषी पर्यवेक्षक महेश घारपुरे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी कै. नाईक यांच्या जीवनपटाचा थोडक्यात आढावा घेतला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच महाराष्ट्र अन्नधान्य, दुग्धोत्पादन, कृषी शिक्षण, सिंचन, वीज प्रकल्प आणि ग्रामविकास यांसारख्या क्षेत्रांत अग्रेसर झाला, असे सांगत ते आधुनिक महाराष्ट्राचे 'महानायक' होते, असे त्यांनी नमूद केले.
जयंती आणि कृषी सप्ताहाचे औचित्य साधून कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, भात पैदास विभाग, कृषिविद्या प्रक्षेत्र आणि एम.ए.ई. प्रक्षेत्रावर शास्त्रज्ञ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध वृक्षांचे सामूहिक वृक्षारोपण केले. डॉ. वाघमोडे यांनी यावेळी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले आणि प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्याचे हिरीरीने संगोपन करण्याची गरज प्रतिपादित केली.
सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी डॉ. वाघमोडे यांनी भात पैदास विभागाच्या प्रक्षेत्रावर नारळ वाढवून 'कर्जत-५' बीजोत्पादन प्लॉटचे पूजन केले. पेढे वाटून आणि उत्साहात लावणी करून कृषी सप्ताहाची यशस्वी सांगता करण्यात आली. यावेळी कृषी विद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर, कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी केळुसकर, कनिष्ठ भात पैदासकार डॉ. महेंद्र गवई, वरिष्ठ संशोधन छात्र अनिरुद्ध मदने आदी उपस्थित होते.
Krishi Saptah, Karjat Agriculture Research Center, Vasantrao Naik, Agricultural Day, Tree Plantation, Agricultural Research, Maharashtra Green Revolution
#KrishiSaptah #Karjat #VasantraoNaik #AgricultureMaharashtra #GreenRevolution #TreePlantation #AgriculturalResearch #FarmersDay

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: