पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ०५ पथकाने टिपू पठाण टोळीमधील 'मोका' गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीस तेलंगणा राज्यातून जेरबंद केले आहे. पुणे शहरातील पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर असलेल्या पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार, गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर पथक या आरोपींचा शोध घेत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १००/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता सन २०२३ च्या विविध कलमांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ च्या कलम ३ (१), ३ (२), ३ (४) अंतर्गत पाहिजे असलेला आरोपी फैयाज गफार बागवान (वय २८, रा. सय्यदनगर हडपसर पुणे) हा हैद्राबाद, तेलंगणा राज्यातील प्रेमनगर, हाफीसपेठ, गल्ली नंबर ०२ येथे राहत असल्याची माहिती पोलीस अंमलदार नासेर देशमुख आणि राहुल ढमढेरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आरोपी फैयाज गफार बागवान यास मियापूर पोलीस स्टेशन, हैद्राबाद, तेलंगणा हद्दीतून कायदेशीर प्रक्रिया राबवून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची
कामगिरी अपर आयुक्त पंकज देशमुख
यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्यात आली.
Crime, Interstate Arrest, Pune Police, MCOCA Case
#PuneCrime #MCOCA #TipuPathanGang #Arrest #PunePolice #Telangana #CrimeBranch

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: