पुणे: पुणे शहरातील सहकारनगर पोलिसांनी धनकवडी भागात वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. दिनांक २३/०७/२०२५ रोजी धनकवडी येथील केशव कॉम्प्लेक्स, चिंतामणी गणेश मंदिराजवळ फिर्यादींच्या मारुती सियाज कारसह सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेल्या इतर गाड्यांच्या काचा अज्ञात इसमांनी लाकडी बांबू आणि दगडांनी फोडल्या होत्या. आरोपींनी 'आम्ही धनकवडीचे भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागायचे नाही, आम्हास कोणी नडला तर त्यास सोडणार नाही' असे ओरडून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२८(९)(२), ३२४(४), ३४९(२)(३) आणि क्रिमिनल अमेंडमेंट कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार, आरोपी रोहीत कैलास आढाव (वय २१, रा. किरकटवाडी) आणि सुधिर बाप्पु सावंत (वय १९, रा. नांदेड फाटा) हे नवले ब्रिजजवळ गप्पा मारत थांबलेले दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे इतर तीन अल्पवयीन साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ३०,०००/- रुपये किमतीची एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.
ही
कामगिरी अपर आयुक्त राजेश बनसोडे,
उपायुक्त मिलींद मोहीते,
सहा. आयुक्त राहुल
आवारे, वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल पवार
यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्यात आली.
Crime, Local News, Pune Police, Law and Order
#PuneCrime #VehicleVandalism #Dhanakawadi
#PunePolice #Arrested #LawAndOrder #CrimeNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: