मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन; गणेशोत्सवाच्या तयारीला जोमाने सुरुवात
पुणे, दि. १२ जुलै २०२५: रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित भव्य वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला. दत्तवाडी कमानी शेजारील 'ग्राउंड झीरो' येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पुणे भाजपचे सरचिटणीस पुनित दादा जोशी, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष श्री पराग ठाकूर सर, तसेच सामाजिक कार्यकर्ते अमोल शुक्ला आणि भरत अमदापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे शहरातील विविध पथकांतील पदाधिकारी, वादक, तसेच गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या तयारीला वेग:
या सोहळ्यात वाद्यपूजनासोबतच नवीन सराव सत्राचाही प्रारंभ करण्यात आला. अमर लक्ष्मण भालेराव (तात्या) - (संस्थापक, अध्यक्ष रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट व अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट, पुणे) यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे हे गेली ९ वर्षांपासून गणेशोत्सव, पालख्या आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपला ठसा उमटवत आहे. यंदाच्या गणेशोत्सवाची तयारी या पूजन सोहळ्याने अधिकच जोमाने सुरू झाली आहे.
वाद्यपूजन व सराव शुभारंभ सोहळ्यातील रंगीत वेशभूषा, पारंपरिक ढोल-ताशा वादनाचा नाद, आणि विविध सांस्कृतिक घटकांचे दर्शन याने उपस्थितांची मने जिंकली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: