पुणे पोलिसांकडून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण गतीने होणार; पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्तांच्या पोलीस ठाण्यांना भेटी
पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत नागरिकांच्या प्रलंबित गुन्हे आणि तक्रारी अर्ज जलदगतीने निकाली काढण्यासाठी पुणे पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता पोलीस उपायुक्त (DCP) आणि विभागीय सहायक पोलीस आयुक्त (ACP) हे आठवड्यातील ठराविक दिवशी त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस ठाण्यांना भेट देऊन तक्रार निवारणासाठी मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे नागरिकांना आपल्या प्रलंबित तक्रारींबाबत थेट पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
पोलीस उपायुक्त (DCP) हे प्रत्येक मंगळवार ते
गुरुवार, असे तीन दिवस
त्यांच्या परिमंडळातील पोलीस ठाण्यांना भेट
देणार आहेत. या भेटीदरम्यान ते
संबंधित पोलीस ठाण्यांमधील प्रलंबित गुन्हे
आणि तक्रार अर्जांची तपासणी
करून त्यांच्या निर्गतीबाबत मार्गदर्शन करतील.
१५ जुलै
२०२५ रोजी फरासखाना, १६
जुलै २०२५ रोजी
खडक आणि १७
जुलै २०२५ रोजी
शिवाजीनगर पोलीस ठाण्याला परिमंडळ १
चे पोलीस उपायुक्त भेट
देणार आहेत. याचप्रमाणे, परिमंडळ २
मध्ये बंडगार्डन, स्वारगेट, कोरेगाव पार्क;
परिमंडळ ३ मध्ये पर्वती,
उत्तमनगर, वारजे माळवाडी; परिमंडळ ४
मध्ये विश्रांतवाडी, खराडी,
खडकी; आणि परिमंडळ ५
मध्ये बिबवेवाडी, मार्केटयार्ड, वानवडी
येथील पोलीस ठाण्यांना पोलीस
उपायुक्त भेट देतील. नागरिकांना आवाहन करण्यात आले
आहे की, त्यांचे तक्रार
अर्ज प्रलंबित असल्यास त्यांनी या
दिवशी पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे.
त्याचबरोबर, पुणे
शहर पोलीस आयुक्त
कार्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार, सर्व विभागीय सहायक
पोलीस आयुक्त (ACP) हे आठवड्यातील सहा
दिवस आपापल्या विभागातील पोलीस
ठाण्यांना भेट देणार आहेत.
१४ ते
१९ जुलै २०२५
या कालावधीसाठी भेटींचे वेळापत्रक जाहीर
करण्यात आले आहे. यामध्ये सोमवार
ते शनिवारपर्यंत विविध
पोलीस ठाण्यांचा समावेश
आहे. उदा. फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त
१४ जुलै रोजी
फरासखाना, १५ जुलै रोजी
खडक, १६ जुलै
रोजी समर्थ, १७
जुलै रोजी खडक,
१८ जुलै रोजी
समर्थ आणि १९
जुलै रोजी फरासखाना पोलीस
ठाण्याला भेट देतील. या भेटींचा मुख्य
उद्देश प्रलंबित गुन्हे
आणि तक्रार अर्जांवर प्रभावीपणे मार्गदर्शन करणे
हा आहे. नागरिकांनी आपल्या प्रलंबित तक्रारींसाठी किंवा
गुन्ह्यांसंदर्भात
उपस्थित राहावे असे आवाहन
पुणे पोलिसांनी केले
आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: