मतदार नोंदणीसाठी वाघोलीकरांना ५० किलोमीटरचा प्रवास
पुणे, दि. २ जुलै २०२५: एकीकडे सरकार मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांना मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी जागोजागी मतदार नाव नोंदणी अभियान राबवत असताना, दुसरीकडे वाघोली येथील नागरिकांना मात्र मतदार नाव नोंदणीसाठी तब्बल ५० किलोमीटर लांब शिरूर येथे जावे लागत असल्याचा गंभीर आरोप 'वाको वेल्फेअर असोसिएशन'ने केला आहे. निवडणूक कार्यालयाच्या या कार्यपद्धतीवर असोसिएशनने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
वाघोलीतील नागरिकांना मतदार नोंदणीसाठी होणाऱ्या या त्रासाला आणि शिरूर निवडणूक कार्यालयाच्या दुर्लक्षाला वाचा फोडण्यासाठी 'वाको वेल्फेअर असोसिएशन'ने आज, बुधवार, दिनांक २ जुलै रोजी दुपारी एक वाजता पुणे येथील पत्रकार भवन, श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
यावेळी, 'वाको वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष अनिल कुमार मिश्रा हे माध्यमांशी सविस्तर संवाद साधणार आहेत. मतदार नोंदणीतील या अडचणींमुळे नागरिकांना होणारा मानसिक व शारीरिक त्रास, वेळेचा अपव्यय आणि निवडणूक कार्यालयाच्या कार्यपद्धतीतील त्रुटींवर यावेळी प्रकाश टाकला जाईल. सरकारने आपल्याच मोहिमेला छेद देणाऱ्या या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन, वाघोलीकरांची मतदार नोंदणीची सोय त्यांच्या जवळच्या परिसरातच उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या पत्रकार परिषदेत केली जाणार आहे.
Pune, Voter Registration, Election Office, Public Grievance, Wagholi, Shirur, Wako Welfare Association, Civic Issues, Press Conference
#Wagholi #VoterRegistration #Pune #Shirur #ElectionOffice #CivicIssues #WakoWelfareAssociation #PublicGrievance #Journalism

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: