कोरेगाव पार्क पोलिसांची धडक कारवाई: १२ तासात सराईत मोबाईल चोरटे जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

 


पुणे : कोरेगाव पार्क पोलिसांनी शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना अवघ्या १२ तासांच्या आत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ मोबाईल फोन, एक दुचाकी आणि धारदार शस्त्र असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मा. वरिष्ठांच्या सूचनेनुसार कोरेगाव पार्क पोलीस ठाणे गु.र.नं. ६१/२०२५, भा.न्या.सं.क. ३०९(४), ३(५), ११५, ३५१(१), भारतीय शस्त्र अधिनियम कायदा कलम ८(२४) अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास सुरु होता. तपास पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी सिद्धार्थ उमेश मोरे (वय १९), कृष्णा उर्फ विकी टिमरेड्डी धनगर (वय २१) आणि आर्यन संभाजी वाघमारे (वय १९) तसेच एक विधीसंघर्षीत बालक यांचा शोध घेण्यात आला.

तपास पथकातील अंमलदारांनी मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा पाठलाग करून त्यांना शिताफीने पकडले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी आपली नावे उघड केली आणि त्यांनीच गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान आरोपींकडून ४ मोबाईल, एक सुझकी कंपनीची बर्गमेन मोपेड दुचाकी, एक धारदार शस्त्र आणि ३००/- रुपये रोख रक्कम असा एकूण १,५०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईमुळे कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमधील ०३ आणि वानवडी पोलीस स्टेशनमधील ०१ अशा एकूण ०४ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

सदरची कामगिरी अपर आयुक्त राजेश बनसोडे,  उपआयुक्त मिलींद मोहिते,  सहाय्यक आयुक्त अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ  निरीक्षक सुनिल थोरात आणि  निरीक्षक गुन्हे अविनाश शिंदे यांच्या पथकाने यशस्वी केली.

 Mobile Theft, Arrest, Koregaon Park Police, Pune City, Crime Solved, Weapon Seizure 

 #PunePolice #MobileTheft #KoregaonPark #Arrested #CrimeNews #WeaponSeizure

कोरेगाव पार्क पोलिसांची धडक कारवाई: १२ तासात सराईत मोबाईल चोरटे जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त कोरेगाव पार्क पोलिसांची धडक कारवाई: १२ तासात सराईत मोबाईल चोरटे जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त Reviewed by ANN news network on ७/०८/२०२५ ०८:२७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".