भारती विद्यापीठ पोलिसांकडून एक आरोपी अटकेत; गावठी पिस्तूल जप्त

 


 पुणे, ११ जुलै २०२५: पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिसांनी एका सराईत आरोपीकडून ५०,०००/- रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा जप्त करून त्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.  

दिनांक ११ जुलै २०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि स्टाफ पेट्रोलिंग करत असताना,  अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सरहद चौकाकडून वंडरसिटीकडे जाणाऱ्या रोडवरील नारायणी धाम मंदिराच्या मागील बाजूच्या फुटपाथवर एक व्यक्ती गावठी बनावटीचा कट्टा घेऊन थांबला आहे.  

 या माहितीच्या आधारे,  उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाने तात्काळ नारायणी धाम मंदिराच्या मागील बाजूच्या फुटपाथवर जाऊन शोध घेतला असता, निखिल सचिन यादव (वय २४ वर्षे, रा. धनकवडी शेवटचा बस स्टॉप, जानुबाई मंदिराजवळ, फाईव्ह स्टार सोसायटी, घर नंबर १८९, धनकवडी, पुणे) हा त्याच्या ताब्यात गावठी कट्ट्यासह दिनांक १०/०७/२०२५ रोजी रात्री :२५ वाजता मिळून आला.  पोलिसांनी त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करून त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि नंबर ३३१/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम सह २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ () () सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  

ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ निरीक्षकराहुल खिलारे, निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली.  

Crime, Weapon Seizure, Pune Police 

#PunePolice #BharatiVidyapeeth #IllegalArms #WeaponSeizure #CrimeControl



भारती विद्यापीठ पोलिसांकडून एक आरोपी अटकेत; गावठी पिस्तूल जप्त भारती विद्यापीठ पोलिसांकडून एक आरोपी अटकेत; गावठी पिस्तूल जप्त Reviewed by ANN news network on ७/११/२०२५ १०:०३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".