पुणे, ५ जुलै २०२५: 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या भक्तिभावाने विविध कार्यक्रम संपन्न झाले. सतीश मिसाळ फाउंडेशनच्या वतीने यावेळी भाविकांसाठी तब्बल २१ हजार किलो खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भेट देऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि दीपक मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाचे संयोजन अजय डहाळे, श्रीकांत जगताप, ज्योती गोसावी, नलिनी गोसावी, शरद मोरे आणि प्रसन्न जगताप यांनी केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांच्या सेवेसाठी आणि अध्यात्मिक वातावरणासाठी खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमामुळे भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेता आला. 'विठ्ठल-विठ्ठल' च्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात भाविकांनी आषाढी एकादशीचा आनंद लुटला.
Ashadhi Ekadashi, Vitthalwadi, Pune, Khichdi Mahaprasad, Satish Misal Foundation, Chandrakant Patil, Amitesh Kumar, Religious Event, Community Service
#AshadhiEkadashi #Vitthalwadi #Pune #KhichdiMahaprasad #SatishMisalFoundation #ChandrakantPatil #AmiteshKumar #SpiritualEvent #CommunityService

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: