मुख्य तंत्रज्ञ मेघराज प्रेमसिंग पाटील यांचा सेवापूर्ती, सन्मान सोहळा उत्साहात
उरण, दि. ६ जुलै २०२५ : दोंडाईचा, जिल्हा धुळे येथील २२० के. व्ही. उपकेंद्र दोंडाईचा येथील मुख्य तंत्रज्ञ वर्ग दोन मेघराज प्रेमसिंग पाटील यांचा सेवापूर्ती आणि सन्मान सोहळा सौरभ मंगल कार्यालय, दोंडाईचा येथे प्रचंड उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला जितेंद्रसिंह रावल आणि जयदेवसिंह रावल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर, राज्य पारेषण उपक्रम, मुख्य कार्यालय, प्रकाशगंगा, मुंबई येथील मुख्य अभियंता पियुष शर्मा यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी मेघराज पाटील यांनी केलेल्या कामाबद्दल आदराने गौरवोद्गार काढले;
सन्मान आणि हृदयस्पर्शी मनोगत
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थित मान्यवर मंडळींचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पर्यावरण संवर्धनाकरिता रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर, उत्सवमूर्ती मेघराज पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ललिता यांचा शाल, साडी, पुष्पगुच्छ, भेटवस्तू, प्रशंसापत्र व सन्मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मेघराज पाटील यांची कन्या दिव्या, मुलगा चिरंजीव प्रतिक आणि नातू चिरंजीव जियांश यांनी हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या.
मेघराज पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना नोकरीत रुजू झाल्यापासून ते निवृत्तीपर्यंतचा प्रवास आणि यशाचे रहस्य उलगडले. तसेच, वेळोवेळी मिळालेल्या सर्व अधिकारी व सहकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी, आजचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आपले वडील हयात नाहीत, ही सल त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश भामरे आणि कुमारी सेजल काकडे यांनी काव्यात्मक व उत्स्फूर्तपणे करून कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले आणि उपस्थितांकडून भरभरून दाद मिळवली. कार्यक्रमाच्या शेवटी किशोर भामरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
Retirement Ceremony, Felicitation, Meghraj Premsing Patil, Dondaicha, Dhule, Service Appreciation, Mahavitaran, Urgan, Vitthal Mamatabade
#Retirement #Felicitation #MeghrajPatil #Dondaicha #Dhule #ServiceAppreciation #Maharashtra #UranNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: