लाच स्वीकारताना स्वच्छता निरीक्षक रंगेहाथ जेरबंद; एसीबीची मोठी कारवाई

 


मुंबई, २४ जुलै: मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर/दक्षिण विभागातील स्वच्छता निरीक्षक गणेश संभाजी कदम याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.  एका हॉटेल व्यावसायिकाकडून हॉटेल सुरू ठेवण्यासाठी कदम याने ४० हजार रुपयांची लाच मागितली होती.  या प्रकरणी कदम याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

सविस्तर बातमी

 तक्रारदाराचा मित्र एका हॉटेल आस्थापनेचा मालक असून, तक्रारदार गेल्या एक वर्षापासून त्यातील किचन रेस्टॉरंट चालवत होते.  २४ जून २०२५ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका, आर/दक्षिण विभागातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या रेस्टॉरंटची तपासणी केली.  यावेळी त्यांच्याकडे हेल्थ लायसन्स आणि इटिंग हाऊस लायसन्स नसल्याचे आढळून आले.  त्यामुळे अधिकाऱ्यांनी रेस्टॉरंटमधील साहित्य जप्त करून रेस्टॉरंट बंद करण्यास सांगितले.   

 जप्त केलेले साहित्य सोडवण्यासाठी तक्रारदार २८ जून २०२५ रोजी आर/दक्षिण विभाग, मनपा कार्यालयात गेले.  त्यावेळी लोकसेवक गणेश संभाजी कदम, स्वच्छता निरीक्षक, याने त्यांना रेस्टॉरंट पुढील तीन महिन्यांसाठी चालू ठेवण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी केली.  पैसे दिल्यास मॅडम आणि लोकसेवक रेस्टॉरंट चालू देणार नाहीत, असे कदम याने धमकावले.   

 तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी जुलै २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी, मुंबई येथे लेखी तक्रार केली.  या तक्रारीच्या अनुषंगाने जुलै २०२५ रोजी पडताळणी केली असता, लोकसेवक गणेश संभाजी कदम याने तक्रारदाराकडे त्यांच्या कामासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि तडजोडीअंती ३० हजार रुपये स्वीकारण्यास मान्य केल्याचे निष्पन्न झाले.   

 त्यानुसार, २३ जुलै २०२५ रोजी सापळा कारवाई करण्यात आली.  या कारवाईदरम्यान लोकसेवक गणेश संभाजी कदम याला तक्रारदाराकडून ३० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.   

या गुन्ह्याचा तपास निरीक्षक नितीन थोरात करत आहेत. ही कारवाई अपर आयुक्त संदीप दिवाण, अपर उप आयुक्त अनिल तुकाराम घेरडीकर आणि राजेंद्र गणपत सांगळे, तसेच पर्यवेक्षक अधिकारी संतोष गुर्जर  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.   

Anti-Corruption, Bribery, Mumbai Police, ACB, BMC, Arrest, Public Servant

 #MumbaiACB #AntiCorruption #BribeArrest #BMC #CorruptionFreeMumbai #MaharashtraPolice


लाच स्वीकारताना स्वच्छता निरीक्षक रंगेहाथ जेरबंद; एसीबीची मोठी कारवाई लाच स्वीकारताना स्वच्छता निरीक्षक रंगेहाथ जेरबंद; एसीबीची मोठी कारवाई    Reviewed by ANN news network on ७/२८/२०२५ ०२:४८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".