पिंपरी, पुणे: पिंपरी-चिंचवड शहर आम आदमी पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक ३ जुलै २०२५ रोजी "शालेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे, तसेच परीक्षांमध्ये उत्तम यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानही केला जाईल.
शिक्षणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलणाऱ्या आणि समाजात प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमाचे शुभहस्ते आम आदमी पार्टी (महाराष्ट्र राज्य) चे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास आम आदमी पार्टी (महाराष्ट्र राज्य) चे सचिव डॉ. अभिजीत मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम बुधवार, दिनांक ३ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता पिंपळे निलख येथील मुख्य बसस्थानकाजवळ होईल. शहराध्यक्ष रविराज बबन काळे यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आम आदमी पार्टीच्या सामाजिक भान आणि शिक्षणप्रेमाचे प्रतीक असलेल्या या प्रेरणादायी उपक्रमास स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Aam Aadmi Party, Pimpri-Chinchwad, Student Felicitation, School Supplies, Social Initiative, Education, Pune
#AAP #PimpriChinchwad #StudentSupport #EducationInitiative #SocialWork #PuneEvents #PimpleNilakh #AamAadmiParty

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: