पिंपरी (प्रतिनिधी) - लोकनेते, माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने पिंपरी येथील मोरवाडी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना शत्रुघ्न (बापू) काटे यांनी मुंडे साहेबांच्या कार्याची आणि त्यांच्या दूरदृष्टीची आठवण करून दिली.
आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, केशव घोळवे, सरचिटणीस तथा माजी नगरसेवक शीतल शिंदे, अजय पाताडे, शैला मोळक, विजय फुगे, योगिता नागरगोजे, संजय परळीकर,नेताजी शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजात अधिक सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.
-----------------------------------------------------------------------------
#GopinathMunde #BJP #Maharashtra #Politics #Tribute
Reviewed by ANN news network
on
६/०४/२०२५ ०७:१९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: