पुणे: मुंढवा येथे इलेक्ट्रीक कामादरम्यान शॉक लागून एका ३२ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७/०५/२०२५ रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास कुणाल चंद्रकांत रंगदळ यांच्या घराजवळ, तालीम चौक, घोरपडी गाव, पुणे येथे हा प्रकार घडला. फिर्यादी महिलेचे पती किरण मधुकर उघडे (वय ३२ वर्षे, रा. भीमनगर, मुंढवा, पुणे) हे एका ठेकेदाराकडे बिगारी काम करत होते. ठेकेदाराला इलेक्ट्रीक कामे येत नसतानाही, त्याने किरण उघडे यांना एका घरी इलेक्ट्रीकचे काम करण्यास पाठवले.
ठेकेदाराने काम येते की नाही याची कोणतीही शहानिशा न करता, तसेच खबरदारी न घेता आणि इलेक्ट्रीकचा मेन स्विच बंद न करता निष्काळजीपणाने त्यांना पाण्याची मोटर दुरुस्त करायला लावले. त्यामुळे इलेक्ट्रीकचा शॉक लागून किरण उघडे यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे पुढील तपास करत आहेत.
- ------------------------------------------------------------------------------------------------------------- #Accident, #Negligence, #Mundhwa, #Pune, #WorkerSafety
Reviewed by ANN news network
on
६/०५/२०२५ ०६:०१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: