पुणे: पुणे शहरात अनैसर्गिक संबंधांच्या कारणावरून एका व्यक्तीचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या खुनाचा छडा लावत गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०४/०५/२०२५ रोजी विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, मंडई मेट्रो रेल्वे स्टेशनसमोरील बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये एका ५० ते ५५ वयोगटाचा अनोळखी इसम रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा फोन पोलिसांना प्राप्त झाला होता. त्याला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. १३८/२०२५, भा.न्या.स. कलम १०३ (१) प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास करून तो उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. त्यानुसार, घटनास्थळावरील गोपनीय बातमीदारांमार्फत मृत व्यक्तीला मारणारा इसम रमेश प्रकाश सत्रे (वय २१ वर्षे, रा. मु.पो. कातरड, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) हा त्याचा भाऊ याच्या फ्लॅट नं. ५०३, बो-हाडे मळा, शिरूर, पुणे येथे लपला असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे, तात्काळ युनिट ०१ कडील अधिकारी व स्टाफ यांनी शिरूर येथे जाऊन आरोपी रमेश सत्रे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने अनैसर्गिक संबंधांच्या कारणावरून हा खून केल्याची कबुली दिली.
सदरची कामगिरी अपर आयुक्त, गुन्हे, संजय देशमुख, उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा. आयुक्त, गुन्हे-१, गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक युनिट-१ शब्बीर सय्यद, सपोनि अभिजीत पाटील, कृष्णा बाबर, अंमलदार अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, निलेश जाधव, अभिनव लडकत, अमित जमदाडे, निलेश साबळे, शुभम देसाई यांचे पथकाने केली..
- ------------------------------------------------------------------------------------------------------------#PuneCrime, #MurderArrest, #Homicide, #PunePolice, #CrimeSolved
Reviewed by ANN news network
on
६/०५/२०२५ ०६:०७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: