आळंदी: आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीला शेतात फोटो आणि व्हिडिओ काढल्याच्या कारणावरून मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०३/०६/२०२५ रोजी दुपारी ११:३० ते १२:०० वाजण्याच्या सुमारास मौजे कोयाळी तर्फे चाकण, ता. खेड, जि. पुणे येथे ही घटना घडली. आश्रुबा नवनाथ गर्जे (वय ३६ वर्षे, धंदा-मजुरी, रा. पिंपळे गुरव, सांगवी, ता. हवेली, जि. पुणे) हे शेतात कामाचे फोटो व व्हिडिओ काढत असताना, कोयाळी गावातील आरोपी ज्ञानेश्वर नारायण कोळेकर, भानुदास नारायण कोळेकर, दौलत लक्ष्मण कोळेकर आणि इतर तीन अज्ञात इसमांनी त्यांना मारहाण केली.
आरोपींनी फिर्यादीला पट्ट्याने व दगडाने गंभीर जखमी केले. तसेच, त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टरखाली घालण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद देण्यात आली आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक खडके पुढील तपास करत आहेत.
- ----------------------------------------------------------------
- #AlandiCrime, #AttemptedMurder, #Assault, #PunePolice
Reviewed by ANN news network
on
६/०५/२०२५ ०५:५६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: