नाशिकमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का; माजी मंत्री बबनराव घोलप, सुधाकर बडगुजर यांचा शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश

 


नाशिक, १७ जून २०२५: उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बबनराव घोलप आणि उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी नाशिक शहर व जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने हे महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश झाले.   

भाजपमध्ये प्रवेश विकासाकरिता; ५१ टक्क्यांहून अधिक मतांचे उद्दिष्ट - चंद्रशेखर बावनकुळे

यावेळी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, भाजपामध्ये प्रत्येक प्रवेश हा विकासाकरिता होत असतो असे स्पष्ट केले. "कोणत्याही अपेक्षा न ठेवता केवळ नाशिकच्या विकासासाठी या सर्वांनी भाजपाला साथ दिली आहे. नाशिक जिल्ह्याच्या परिवर्तनासाठी हे प्रवेश अत्यंत महत्त्वाचे आहेत," असे ते म्हणाले. प्रवेश केलेल्या सर्वांच्या साथीने आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळवून देण्यासाठी झटून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रवेश केलेल्या प्रत्येकाचा मानसन्मान राखला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आजचा मंगळवारचा दिवस शुभ असल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी आजच हा पक्षप्रवेश ठेवला असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

उत्तर महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आणण्याचे उद्दिष्ट; अबकी बार १०० पार - रविंद्र चव्हाण

भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रवेश केलेल्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे सांगितले. भाजपाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एक परिवाराप्रमाणे काम करायचे आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत 'अबकी बार १०० पार' चे लक्ष्य असणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व महापालिकांमध्ये भाजपाची सत्ता आणणे आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने भाजपा उमेदवार निवडून देणे हे उद्दिष्ट असणार असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

'अनादरामुळे पक्ष सोडला, ताकद दाखवून देऊ' - घोलप, बडगुजर यांची ग्वाही

यावेळी सुधाकर बडगुजर यांनी, १८ वर्षे काम करूनही उबाठा गटात माझा अनादर झाल्याने भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले. "आपला अनादर करणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवून देऊ," असेही ते म्हणाले. आगामी निवडणुकीत भाजपाची ताकद दाखवून देऊ, अशी ग्वाही बबनराव घोलप यांनी दिली.

नाशिकसह जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथूनही प्रवेश

भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये नाशिकचे माजी नगरसेवक अशोक सातभाई, माजी नगरसेविका हर्षा बडगुजर, वंदना बिरारी, शीतल भामरे, माजी सभागृह नेते दिलीप दातीर यांचा समावेश आहे. यावल तालुक्यातील (जिल्हा जळगाव) प्रभाकर सोनावणे, विनोदकुमार पाटील, आर. जी. पाटील, अनिल पाटील, आरती पाटील, लताबाई पाटील आदींनीही भाजपामध्ये प्रवेश केला. तसेच, पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या मनसेचे अश्वीन जयस्वाल, छत्रपती संभाजीनगरचे भगवान पवार, उद्योजक मनोज पवार आदींनीही यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी डॉ. राजेंद्र फडके, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष सुनील केदार, बाळासाहेब सानप, विजय साने, प्रशांत जाधव, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.  


  •  Nashik, BJP, Shiv Sena UBT, Political Defection, Babanrao Gholap, Sudhakar Badgujar, Maharashtra Politics, Local Elections, Chandrashekhar Bawankule, Ravindra Chavan, Girish Mahajan.
  •  #Nashik #BJP #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #PoliticalDefection #BabanraoGholap #SudhakarBadgujar #NashikElections #AbkiBaar100Paar #GirishMahajan.
नाशिकमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का; माजी मंत्री बबनराव घोलप, सुधाकर बडगुजर यांचा शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश नाशिकमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का; माजी मंत्री बबनराव घोलप, सुधाकर बडगुजर यांचा शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश Reviewed by ANN news network on ६/१७/२०२५ ०८:४८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".