Urban95 अंतर्गत पुणेत लहान मुलांसाठी अनुकूल सार्वजनिक जागा निर्माणाची योजना
पुणे, १७ जून: पुणे महानगरपालिकेने Urban95 अंतर्गत 'Nurturing Neighbourhoods 2.0' या उपक्रमांतर्गत बहु-क्षेत्रीय समविचार बैठकीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात लहान मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी अनुकूल शहर घडवण्याच्या दृष्टिकोनाचे अनुसरण करण्यात आले आणि कुटुंब-मित्र सार्वजनिक जागांमाठी डिझाईन मार्गदर्शक तत्त्वांचे प्रकाशन करण्यात आले.
या उपक्रम गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, स्मार्ट सिटी मिशन आणि व्हॅन लीअर फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आणि WRI इंडिया यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाबाली राबवला जात आहे. यामध्ये बाल्यावस्थेच्या आरोग्यपूर्ण विकासाला आणि पालकांच्या कल्याणाला चालना देणाऱ्या समावेशक आणि लहान मुलांसाठी अनुकूल शहरी जागा निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे.
कुटुंब-मित्र शहराची संकल्पना
पुणे शहरात प्रत्येक झोनमध्ये सुरक्षित, समावेशक आणि आकर्षक सार्वजनिक जागा व बालविकास केंद्रांमध्ये प्रवेश सुधारणे आणि वापरात नसलेल्या जागांचा पुनर्विचार करणे यावर भर देण्यात येत आहे. लहान मुलांचे आरोग्य त्यांच्या आजवाजूच्या वातावरणावर आणि पालकांशी होणाऱ्या संवादावर अवलंबून असते हे लक्षात घेऊन, शहर लहान मुलांकरिता कीर्ति सार्वजनिक जागा तयार करत आहे आणि त्यांचबरोबर पालकांच्या देखील गरजा पूर्ण करण्याच्या सेवा सक्षम करत आहे.
व्यापक सामाजिक सहभाग
पुढे जाऊन, पुणे शहरात लहान मुलं आणि पालकांच्या कल्याणाला संस्थात्मक रूप देण्याचा उद्देश अनुकूल, त्यासाठी सकारात्मक पालकत्व पद्धती प्रोत्साहित करणे, सामाजिक व वर्तनात्मक बदल घडवणे आणि सार्वजनिक जागा समावेशक व सुरक्षित बनवणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी डेटा-आधारित नियोजन, अधिकाऱ्यांचे व फील्ड वर्कर्सचे प्रशिक्षण आणि समुदाय, NGO आणि नागरी संस्थांचा सहभाग आवश्यक आहे.
तांत्रिक मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य
कार्यशाळेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या डिझाईन मार्गदर्शक तत्त्वांद्वारे सार्वजनिक जागांचे डिझाईन आणि अमलबजावणीसाठी तांत्रिक आधार मिळणार आहे. शहराच्या वाढ विकास अधिकारी विविध विभागांमग समन्वय साधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. या समविचार बैठकीत विविध भागधारकांची एकत्र रणनीती ठरवण्यात व शहराच्या एकत्रित दृष्टिकोन तयार केला. ४० हून अधिक सहभागी सदस्यांनी सहभागी उपक्रमांतून पूर्णत्व 'कुटुंब-मित्र' शहर बनवण्यासाठी स्वत:ची भूमिका जाणून घेतली.
अतिरिक्त महापालिका आयुक्तांचे मार्गदर्शन
अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले, "पुणे हे लहान मुलं आणि पालकांना केंद्रस्थानी ठेवून शहरी विकासाकडे पाहण्याच्या भारतातील अग्रणी मोजक्या शहरांपैकी एक आहे. पुणे किडस फेस्टिव्हलसारख्या उपक्रमांनी आम्ही दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारला आहे आणि आता Nurturing Neighbourhoods 2.0 अंतर्गत हे उपक्रम मुख्य प्राधान्य आणण्यासाठी आणि संस्था पातळीवर रुजवण्यासाठी प्रवत करत आहोत."
आंतरराष्ट्रीय संस्थांचे योगदान
अनुश्री पाटील, कार्यक्रम व्यवस्थापक, सस्टेनेबल सिटीज आणि ट्रान्सपोर्ट, WRI इंडिया म्हणाले, "ही कार्यशाळा पुण्यातील भागधारकांना सामाजिक व वर्तनात्मक बदलांमुळे विविध उपाययोजनांची समज देण्यात उपयुक्त ठरली. सार्वजनिक जागेचा बापार लहान मुलं आणि त्यांच्या कुटुंबांसाठी कसा वाढवता येईल हे ठरवण्यात मदत झाली. WRI इंडिया म्हणून आम्ही पुणे शहरला इतर शहरांसाठी आदर्श (Lighthouse) बनवण्यास पाठिंबा देत राहू. शहरांची रचना बाल्यावस्थेतील अनुभवावर परिणाम करते यावर आमचा विश्वास आहे."
भविष्यातील दिशा
आमीर पटेल, वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, इंडिया, Urban95, Van Leer Foundation म्हणाले, "जीवनाची चांगली सुरुवात ही प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे. त्यासाठी लहान मुलं व त्यांच्या पालकांचे आरोग्य व कल्याण महत्त्वाचे आहे. शहरांमध्ये अशी सेवा व कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत जे पालकांसाठी आधारभूत वातावरण तयार करतील. भारतात Urban95 व Nurturing Neighbourhoods 2.0 अंतर्गत आम्ही शहर प्रशासन, नेते व चॅम्पियन्सना स्थानिक गरजांनुसार उपाययोजना विकसित करण्यासाठी पाठिंबा देत आहोत. पुणे या दृष्टिकोनाला मुख्य प्राधान्य आणील आणि NN 2.0 च्या माध्यमातून इतर शहरांसाठी उदाहरण बनेल अशी मला आशा आहे."
ही समविचार बैठक पुणे शहराच्या कुटुंब-मित्र शहर बनण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. शासकीय विभाग, नागरी संस्था आणि WRI इंडिया यासारख्या तांत्रिक भागीदारांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पुणे शहरात लहान मुलांच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या जीवनमानाच्या उदत्तीसाठी उपयुक्त जागा निर्माण होतील.
--------------------------------------------------------------------------------
- Pune Municipal Corporation
- Urban95
- Nurturing Neighbourhoods 2.0
- Child-friendly City
- Family-friendly Spaces
- WRI India
- Van Leer Foundation
- Urban Development
- Smart City Mission
- Public Space Design
#PuneDevelopment #Urban95 #NurturingNeighbourhoods #ChildFriendlyCity #FamilyFriendlySpaces #WRIIndia #VanLeerFoundation #UrbanPlanning #SmartCityMission #PublicSpaces #EarlyChildhoodDevelopment #PuneMunicipalCorporation

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: