नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव का नाही? : महेंद्र घरत


उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव अद्याप न देण्यावरून राजकारण्यांच्या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी जावळे येथे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सत्यनारायण पूजेनिमित्त जावळे ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते.

घरत म्हणाले, "प्रकल्पग्रस्तांसाठी दि. बा. पाटील यांचा संघर्ष त्यांच्या हयातीतही थांबला नव्हता. आज विमान उडण्याची वेळ आली तरी त्यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जात नाही, हे राजकारण्यांचे काय गौडबंगाल आहे? अद्याप नावाची घोषणा न होणे, हे प्रकल्पग्रस्तांचे दुर्दैव आहे." मुंबई आणि दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना परमेश्वर सद्बुद्धी देवो आणि दि. बा. पाटील यांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

प्रकल्पग्रस्तांसाठी  संघर्ष: 

दि. बा. पाटील यांच्यानंतर प्रकल्पग्रस्तांना कोणताही मोठा आधार राहिलेला नाही, त्यामुळे आपण त्यांचे कार्यकर्ते म्हणून सदैव प्रयत्नशील असल्याचे घरत यांनी सांगितले. ते म्हणाले की, "जावळे आणि शेलघर ही दोन्ही गावे दिवंगत भगत साहेबांपासून आम्ही एकच समजतो. जावळे गावातील विद्यार्थी १९७०-१९८० पर्यंत शेलघरच्या जिल्हा परिषद शाळेत येत होते, ते सारे आमचे वर्गमित्र होते. त्यामुळे इतर गावांपेक्षा जावळे ग्रामस्थांबाबत जास्त आत्मीयता आहे. जावळे ग्रामस्थांसाठी मी मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतो." जावळे गावाला मैदान, तलाव, समाजमंदिर यांसारख्या नागरी कामांसाठी पाठपुरावा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आमदार, खासदार केवळ निवडणुकीपुरते आणि मतांसाठी असतात, अशी टीकाही त्यांनी केली.

मंदिर कामांसाठी घरत यांचा सिंहाचा वाटा: 

यावेळी बोलताना मो. का. मढवी गुरुजी यांनी घरत यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, "महेंद्र घरत ही खूप मोठी शक्ती आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. जिथे जिथे मंदिर, तिथे तिथे त्यांचा खारीचा वाटा आहेच, हे मी अभिमानाने सांगेन. प्रकल्पग्रस्त आणि विमानतळबाधित गावांच्या मंदिरांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यात  घरत यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच आज स्थलांतरित गावांची मंदिरे भव्यदिव्य होत आहेत."

जावळे ग्रामस्थांनी सांगितले की, हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारात  घरत यांनी २० वर्षांपूर्वीही सढळ हस्ते मदत केली होती आणि मंदिराचे ट्रस्ट रजिस्ट्रेशनही स्वखर्चाने केले होते. आता पुन्हा एकदा पावसाळ्यात मंदिरात पाणी येत असल्याने ग्रामस्थांनी साकडे घातल्यावर, त्यांनी तात्काळ पाच लाख रुपये खर्च करून ते काम पूर्ण केले. त्यांच्या या सहकार्याबद्दल जावळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी कृष्णा कडू, अनंता घरत, रमेश घरत, अण्णा कडू, जगदीश ठाकूर, अरुण घरत आणि मोठ्या संख्येने जावळे ग्रामस्थ उपस्थित होते.


Navi Mumbai International Airport, Di. Ba. Patil, Mahendrasheth Gharat, Raigad, Uran, Project Affected Persons (PAP), Political Issue, Airport Naming, Social Work, Temple Renovation, Congress Leader.

 #NaviMumbaiAirport #DiBaPatil #MahendrashethGharat #Uran #Raigad #PAPRights #PoliticalControversy #SocialWork #MaharashtraPolitics #AirportNaming

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव का नाही? : महेंद्र घरत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव का नाही? :  महेंद्र घरत Reviewed by ANN news network on ६/११/२०२५ ०६:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".