या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी येत्या तीन महिन्यांत संपूर्ण शहर व जिल्ह्यात पक्षाचे जाळे मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत ठरल्याप्रमाणे, सर्व पदाधिकारी शाखा उद्घाटनांवर विशेष भर देणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणाबरोबर युती करायची, याचा निर्णय निवडणुकीच्या ऐन वेळेस घेतला जाईल, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस संजय आल्हाट यांच्यासह कृष्णा पवार, अभिजीत पाटील, आलोक गिरणे, रणजीत सोनावळे, नारायण भिसे, कल्पना जावळे, योगिता साळवे, रुक्मिणी केंद्रे, आनंद शिंदे, विजय अठवाल, राजू आढाव, जयवंत कांबळे, शिवप्रसाद ईश्वरकट्टी, अनिल मोळवणे, प्रवीण बनसोडे, राम आल्हाट, जमालुद्दीन खान आणि राहुल उभे यांसारखे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीतून लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) ने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर उतरण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे, ज्यामुळे स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Pune Municipal Corporation Elections, Pimpri Chinchwad Municipal Corporation Elections, Lok Janshakti Party (Ram Vilas), Political Strategy, Independent Fight, Party Meeting
#LJP #PunePolitics #PCMC #MunicipalElections #LokJanshaktiParty #SanjayAlhat #Pune #PimpriChinchwad #MaharashtraPolitics
Reviewed by ANN news network
on
६/१४/२०२५ ०९:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: