ज्येष्ठ उद्योजक, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे आणि ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक दिलीप कोटीभास्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अनिरुद्ध देशपांडे, दिलीप कोटीभास्कर, अजित कुलकर्णी, सुरेश दाबक, पिनाक वाघ, राहुल पंडित आणि कपिलेश भाट्ये या बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांनी प्रकट मुलाखतीद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. 'बिटो'चे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरीची प्रत आणि पुणेरी पगडी देऊन या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. परिषदेत विविध क्षेत्रांतील उद्योजक आणि व्यावसायिकांनी व्यवसायविषयक सादरीकरणे केली.
मान्यवरांचे मार्गदर्शन
अनिरुद्ध देशपांडे यांनी संवाद साधताना सांगितले की, "क्रीडा क्षेत्रामुळे दिग्गज मंडळींशी संबंध आला. त्यामुळे ब्राह्मण व्यावसायिकांनी असे मानू नये की संपर्क साधणे अवघड असते. आपल्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करावे, वेळ वाया घालवू नये. इतर व्यापारी समाजातील व्यक्ती व्यवसायासाठी परगावात जायला तयार असतात, आपण देखील परगावात व्यवसाय करण्याची तयारी ठेवली पाहिजे."
दिलीप कोटीभास्कर म्हणाले, "आपण विविध विषयांवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करता आले पाहिजे."
बांधकाम व्यावसायिक अजित कुलकर्णी यांनी, "खिशात काहीही पैसे नसतानाही व्यवसाय करता येतो. अक्कलहुशारीने पुढे जाता आले पाहिजे. जिद्द, चिकाटी असली पाहिजे," असे मार्गदर्शन केले.
सुरेश दाबक म्हणाले, "बांधकाम व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. कमी मनुष्यबळात काम करता आले पाहिजे. मराठी मनुष्यबळ या व्यवसायात आले पाहिजे."
पिनाक वाघ यांनी "विविध आदर्श डोळ्यासमोर असतील तर मार्ग सुकर होतो," असे मत व्यक्त केले, तर कपिलेश भाट्ये म्हणाले, "चांगले भागीदार मिळणे ही महत्त्वाची गोष्ट ठरते."
'बिटो'च्या कार्याची माहिती
'ब्राह्मण इंडस्ट्रियल अँड ट्रेडर्स ऑर्गनायझेशन' (BITO) चे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी बिटोच्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले, "ब्राह्मण समाजाने नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात पुढे जावे. इतर समाजाशी स्पर्धा न करता स्वतःचा ठसा उमटवावा. एकमेकांना मदत करत पुढे गेले पाहिजे."
मनोज तारे यांनी स्वागत केले, तर नाना अभ्यंकर यांनी प्रस्तावित ब्राह्मण चेंबर्सचे नियोजन मांडले. मेघा म्हसवडे आणि आदिती जोशी यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. नीता जोशी, संदीप जोशी, अभिषेक जोशी, अविनाश कुलकर्णी, प्रवीण शिरसीकर, संजय देशमुख, नाना भांगे, सुधीर दाबके, अजित कुलकर्णी, तृप्ती तारे, महेंद्र मणेरीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. नितीन शुक्ल यांनी आभार मानले.
Pune, Brahmin Industrial and Traders Organization, BITO, Brahmin Mahasangh, Entrepreneurship, Business Conference, Aniruddha Deshpande, Dilip Kotibhaskar, Anand Dave, Business Networking, Community Development, Pune Event
#Pune #BITO #BrahminEntrepreneurs #BusinessConference #Entrepreneurship #CommunityDevelopment #Networking #AniruddhaDeshpande #DilipKotibhaskar #MaharashtraBusiness

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: