'संकल्प ते सिद्धी' आणि विकासाची घोडदौड
जावडेकर म्हणाले, "'संकल्प ते सिद्धी' हे अभियान म्हणजे मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या अतुलनीय वाटचालीचा गौरव आहे. आज भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे, पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडत आहे आणि सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल होत आहेत." त्यांनी शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सरकारने प्रत्येक स्तरावर केलेल्या कामांवर प्रकाश टाकला. "'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' हे केवळ एक घोषवाक्य नसून, ते मोदी सरकारच्या कारभाराचे आणि भारताच्या विकासाचे मूलभूत तत्त्व आहे," असेही ते म्हणाले. पुढील काळातही देशाची ही विकासाची घोडदौड अशीच वेगाने सुरू राहील आणि भारत एका नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'बुद्धिजीवी संमेलना'चे आयोजन
राष्ट्रीय समितीने सुरू केलेल्या 'संकल्प ते सिद्धी' अभियानांतर्गत, भाजप पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात हे 'बुद्धिजीवी संमेलन' शनिवारी, सायंकाळी हॉटेल कलासागर, कासारवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला डॉक्टर, वकील, सीए, अभियंता अशा विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थित राहून भारताच्या विकासाची वाटचाल आणि पुढील दिशा यावर विचारमंथन केले.
भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि आमदार तथा बुद्धिजीवी संमेलनाचे आयोजक महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. बुद्धिजीवी संमेलनाचे संयोजक ऍड. गोरखनाथ झोळ, सहसंयोजक सीए बबन डांगले, दीपक भंडारी, चैतन्य पाटील, अमेय देशपांडे व डॉ. प्रताप सोमवंशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, राहुल जाधव, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, सरचिटणीस संजय मंगोडेकर, विजय उर्फ शीतल शिंदे, अजय पाताडे, शैला मोळक, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात देशाने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीची प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक संजय मंगोडेकर यांनी केले, सूत्रसंचालन मोरेश्वर शेडगे यांनी केले, तर आभार राजेश पिल्ले यांनी मानले.
Pimpri-Chinchwad, Narendra Modi, Prakash Javadekar, BJP, Shatrughna Kate, Buddhijivi Sammelan, Sankalp Se Siddhi, Economic Growth, Infrastructure Development, Digital India, Good Governance, India's Progress, Political Event
#NarendraModi #PrakashJavadekar #BJP #PimpriChinchwad #IndianEconomy #Development #BuddhijiviSammelan #SankalpSeSiddhi #DigitalIndia #GoodGovernance

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: