पुणे: खडकी येथील औंध रोडवरील अमृतस्विट दुकानासमोर पहाटे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या १७ वर्षीय मुलाच्या हातातून मोटारसायकलवरील तीन अनोळखी इसमांनी २० हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला आहे.
या प्रकरणी एका मुलाने (वय १७ वर्षे, रा. औंध, पुणे) तक्रार दिली आहे. आरोपींमध्ये मोटारसायकलवरील अनोळखी तीन इसम यांचा समावेश असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दि. ०९/०६/२०२५ रोजी पहाटे ०४:५५ वाजण्याच्या सुमारास ४६, औंध रोड, आमृतस्विट दुकानासमोर, खडकी, रेंजहिल्स, पुणे येथे ही घटना घडली. फिर्यादी मॉर्निंग वॉक करत असताना, नमूद इसमांनी पाठीमागून येऊन त्यांना हत्याराचा धाक दाखवला आणि त्यांच्या हातातील २०,०००/- रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला.
या प्रकरणी खडकी स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १६६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) (जबरी चोरी), ३ (५) (गुन्हेगारी कट) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे करत आहेत.
- ----------------------------------------------------------------------------------------------------------------
- Crime, Mobile Snatching, Robbery, Theft, Khadki, Pune, Juvenile Victim
- #MobileSnatching, #KhadkiCrime, #Robbery, #PunePolice, #YouthSafety

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: