चिखली (पुणे) - चिखली येथे अंमली पदार्थाच्या अवैध व्यापारात गुंतलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ३१ मे २०२५ रोजी दुपारी १२.०५ वाजता आकृती क्लासिक बिल्डिंग जवळ हॉटेल ग्रँड मैफिल समोर नेवाळे वस्ती, चिखली पुणे येथे ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणी एनडीपीएस कायदा (NDPS Act) कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आशिष ज्ञानदेव बनकर हा पोलिस हवालदार क्रमांक १४५८ असून तो मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड येथे कार्यरत आहे.
अटक झालेले आरोपी अक्षय बाळासाहेब हिंगे (वय २७ वर्षे) राहणार संसर ता. इंदापूर, जि. पुणे आणि प्रतिक दत्तात्रेय निंबाळकर (वय २८ वर्षे) राहणार भवानीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे असे आहेत. सध्या दोन्ही आरोपी अटकेत आहेत.
तपशील देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी मजकूर यांनी त्यांच्या कब्जात एकूण १,२५,००० रुपये किंमतीची यामाहा FZ मोटारसायकल व १,०४,००० रुपये किंमतीचा २ किलो ८४ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकारांने, बेकायदेशीररित्या विक्री करिता कब्जात बाळगताना मिळून आला.
--------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा