पंढरपूर वारीनिमित्त हिंदू जनजागृती समितीचे विविध उपक्रम

 


 आरोग्य तपासणी शिबिर आणि सामाजिक उपक्रम

पुणे: हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पंढरपूर वारीनिमित्त विविध सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक जाणीव जोपासली जावी आणि समाजाला त्याचा अधिकाधिक लाभ मिळावा या उद्देशाने आरोग्य तपासणी, मंदिर स्वच्छता, अन्नदान, शालेय साहित्य वाटप यांसारखे उपक्रम नियमितपणे राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून, २१ जून रोजी मंगळवार पेठ गावठाण, पुणे येथे वारकऱ्यांसाठी एका विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या आरोग्य शिबिरात 'हिंदू जनजागृती समिती' न्यासाच्या वतीने ३०० हून अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना आवश्यक ती औषधेही पुरवण्यात आली. काही वारकऱ्यांच्या पायाला झालेल्या जखमांवर ड्रेसिंग करून त्यांना औषधोपचार करण्यात आला. ही आरोग्य तपासणी डॉ. प्रज्ञा सीडाम आणि डॉ. प्राजक्ता बनकर यांनी केली.

याचबरोबर, २२ जून रोजी हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. हा सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला.

दरम्यान, वारीमध्ये काही अन्यधर्मीय धर्मप्रसार करत असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे. या प्रकारावर कठोर कारवाई करण्यात यावी, या संदर्भात समितीने पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार विजयबापू शिवतारे यांना निवेदन दिले. या निवेदनाची तात्काळ दखल घेत  शिवतारे यांनी तातडीने डीसीपी राजकुमार शिंदे यांना फोन करून या प्रकरणी एफआयआर दाखल करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मानकरी देखील आवर्जून उपस्थित होते.

हिंदू जनजागृती समितीच्या या उपक्रमांमुळे वारीतील सामाजिक बांधिलकी जपली जात असून, त्याचबरोबर धार्मिक आणि सांस्कृतिक पावित्र्य जपण्याच्या उद्देशाने 'धर्मप्रचारा'ला विरोध करण्याची भूमिकाही ठळकपणे मांडली जात आहे.


Hindu Janajagruti Samiti, Pandharpur Wari, Social Initiatives, Health Camp, Religious Conversion, Christian Missionaries, Public Awareness, Maharashtra Culture, Pune

 #PandharpurWari #HinduJanajagrutiSamiti #HealthCamp #Warkari #ReligiousFreedom #AntiConversion #MLA VijaybapuShivtare #PuneNews #CulturalPreservation #Maharashtra

पंढरपूर वारीनिमित्त हिंदू जनजागृती समितीचे विविध उपक्रम  पंढरपूर वारीनिमित्त हिंदू जनजागृती समितीचे विविध उपक्रम Reviewed by ANN news network on ६/२४/२०२५ ०८:५३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".