पुणे: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ईश्वरी देशपांडे यांच्या एकल कथक नृत्याचा कार्यक्रम शनिवार, दि. २८ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे आयोजित करण्यात आला आहे.
ईश्वरी देशपांडे या ज्येष्ठ नृत्यांगना प्रेरणा देशपांडे यांच्या कन्या आणि शिष्या आहेत. त्यांना तबल्यावर ईशान परांजपे, संवादिनीवर यशवंत थिटे, गायनात शुभम खंडाळकर आणि पढतमध्ये कल्याणी गोखले हे साथसंगत करणार आहेत. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत प्रस्तुत होणारा हा २५० वा कार्यक्रम आहे.
भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाला सर्व रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
Pune, Dance Performance, Kathak, Cultural Event, Bharatiya Vidya Bhavan, Infosys Foundation, Ishwari Deshpande
#PuneEvents #Kathak #DancePerformance #BharatiyaVidyaBhavan #InfosysFoundation #CulturalEvent #IshwariDeshpande #IndianDance #PuneCulture #FreeEvent

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: