रविवार, १ जून, २०२५

कोथरूडमध्ये बंद फ्लॅटमधून १७ लाख २० हजारांचे दागिने चोरी


पुणे: कोथरूडमधील भुसारी कॉलनीतील व्यंकटेश्वरा अपार्टमेंटमधील एका बंद फ्लॅटमधून अज्ञात चोरट्यांनी १७ लाख २० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे आणि हिऱ्यांचे दागिने चोरून नेले. 

ही घटना ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ७:३० ते ३१ मे २०२५ रोजी सकाळी ६:०० च्या दरम्यान घडली.

 फिर्यादी महिला २४ वर्षांची असून त्या भुसारी कॉलनीत राहतात. त्यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद असताना, अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटातून लाखोंचे दागिने चोरले. 

या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप अधिक तपास करत आहेत.

----------------------------------------------------------------------------------------------------

#PuneCrime #BurglaryInPune #HousebreakingTheft #KothrudPolice #JewelryTheft

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा