पिंपळे सौदागर: पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या ४७ वर्षीय व्यक्तीची २७,५०,०००/- रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे.
व्हॉट्सॲप नंबर ८०८७६४७८२३ द्वारे संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास २००% परतावा मिळेल असे आमिष दाखवण्यात आले. FYERS Investment Group मध्ये सामील करून HNWACC ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगण्यात आले आणि त्याद्वारे गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) आणि भा. दं. सं. कलम ३१६ (२), ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
- ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- #CyberCrime #OnlineFraud #Pune #FinancialCrime #PimpaleSaudagar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा