पुणे: शनिवार पेठेतील विष्णूकृपा हॉल येथे २९ जून २०२५ रोजी "ज्योतिष साधना महोत्सव" मोठ्या उत्साहात पार पडला. श्री ज्योतिष संशोधन केंद्र (जळगाव), पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. आणि अभिजीत प्रतिष्ठान (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवाचे उद्घाटन आणि विशेष क्षण
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सुनील पुरोहित यांनी अध्यक्षस्थान भूषवले, तर सौ. श्वेता बोकील या महोत्सवाच्या स्वागताध्यक्षा होत्या.
या महोत्सवात 'ज्योतिश्री' या मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, ॲस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त (६० व्या वाढदिवसानिमित्त) विशेष सत्कार करण्यात आला. 'ज्ञानज्योती प्रतिष्ठान' या नवीन संस्थेचे उद्घाटनही डॉ. मिलिंद पांडे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ज्योतिषविषयक नव्या पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. श्री ज्योतिष संशोधन केंद्राचे साठ विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून या महोत्सवात कार्यरत होते.
यावेळी पितांबरी प्रॉडक्ट्सचे संतोष जोशी, अभिनेता हार्दिक जोशी, विजय जकातदार, सुनील पुरोहित, आनंद रेखी, आनंद दवे, मिलिंद पांडे, अर्चना सुरडकर, गोविंद कुलकर्णी, डॉ. ज्योती जोशी, सरिता पद्मन, अतुल आगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. ज्योती जोशी यांनी प्रास्ताविक केले, तर हेमंत बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.
ज्योतिष शास्त्रावरील विचारमंथन
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. मिलिंद पांडे यांनी सांगितले की, "ज्ञान आणि श्रद्धा यांचा समतोल साधत ज्योतिष शास्त्राचा अभ्यास हाच नव्या युगाचा वेध आहे." इतर व्यवसायातील व्यक्तींना जसे 'एंट्रप्रिन्युअर' म्हटले जाते, त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्रानुसार व्यावसायिक असणाऱ्या व्यक्तींना 'ॲस्ट्रोप्रिन्युअर' असे म्हणायला हवे, असे मत डॉ. पांडे यांनी व्यक्त केले. ज्योतिष शास्त्रात आज अंदाजे २० लाखांहून अधिक ज्योतिष तज्ज्ञ कार्यरत असून, सध्या या क्षेत्रात ४५ कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होते आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
डॉ. ज्योती जोशी यांनी, "भविष्यशास्त्र वा ज्योतिषशास्त्र हा केवळ आर्थिक व्यवसाय न राहता, ती एक ज्ञान साधना व्हावी," असे मत व्यक्त केले. पारंपरिक ज्योतिषशास्त्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास त्याची विश्वासार्हता वाढेल, यासाठी नवीन ॲप तयार करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
सुनील पुरोहित यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात "यूट्यूबवरील भयानक भविष्यवाणीवर फार विश्वास ठेवू नये! आपले चांगले विचारच खऱ्या अर्थाने आपले आयुष्य घडवत असतात," असा सल्ला दिला.
Pune, Jyotish Sadhana Mahotsav, Astrology Festival, Shri Jyotish Sanshodhan Kendra, Pitambari Products, Abhijit Pratishthan, Jyotishree App, Dr. Milind Pande, Dr. Jyoti Joshi, Knowledge and Faith, Astropreneur, Book Launch, Spiritual Event
#Pune #Astrology #JyotishSadhanaMahotsav #JyotishreeApp #DrMilindPande #DrJyotiJoshi #SpiritualEvent #KnowledgeAndFaith #Astropreneur #PuneEvents

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: