पुणे, २२ जून २०२५: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज संध्याकाळी दिवेघाट ओलांडून सासवडकडे पोहोचली आहे. वारकरी, दिंडी, पताका, टाळ-मृदंगांचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषानं पूर्ण दिवे घाट मार्ग दुमदुमन गेला होता, ज्यामुळे हे दृश्य पाहणाऱ्यांची नजरबंदी झाली. आज रात्री या पालखीचा मुक्काम सासवडमध्येच असणार आहे.
दरम्यान, संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर येथे पोहोचली असून, आज रात्री या पालखीचा मुक्काम इथेच असणार आहे.
आज सकाळी पहाटेची नित्य पूजा झाल्यानंतर, सर्वप्रथम संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, आणि त्यापाठोपाठ जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांची पालखी पुणे-सोलापूर रस्त्याने मार्गस्थ झाली. सोलापूर रस्त्यावर, हडपसर उपनगरातील भाविकांनी पालख्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. भैरोबा नाला आणि हडपसर येथील आपापला विसावा घेऊन दोन्ही पालख्या वेगवेगळ्या दिशेने पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाल्या होत्या.
Sant Dnyaneshwar Palkhi, Sant Tukaram Palkhi, Saswad, Diveghat, Loni Kalbhor, Warkari, Dindi, Palkhi Sohala, Pune-Solapur Road, Hadapsar, Pilgrimage, Maharashtra.
#PalkhiSohala #SantDnyaneshwar #SantTukaram #Wari #Maharashtra #Pilgrimage #Saswad #LoniKalbhor #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: