नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधांना गती (VIDEO)

 


कुंभमेळ्यासाठी आठ प्रमुख मार्गांना केंद्रीय महामार्ग मंत्रालयाची तत्वत: मान्यता; भाविकांना विस्तारित रस्ते मिळणार - मुख्यमंत्री

नागपूर, २३ जून २०२५: नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. कुंभमेळ्या दरम्यान भाविकांना विस्तारित रस्त्यांचं जाळं उपलब्ध करण्यासाठी आठ प्रमुख मार्गांना केंद्रीय महामार्ग मंत्रालयाकडून तत्वत: मान्यता मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

नागपूरमधल्या हैदराबाद हाऊस इथे, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे २०२७ ला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ते विकासासंदर्भात एक बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, कुंभमेळ्यासाठी राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या तसेच नाशिककडे जाणाऱ्या आवश्यक आठ प्रमुख मार्गांना तत्वत: मान्यता देण्यात आली असून, लवकरच त्यांचा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला जाईल. मुंबई, पालघर, गुजरात, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नागपूर या मार्गावरील जास्तीत जास्त उपयोगात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांबाबत या बैठकीत चर्चा झाली. या कुंभमेळ्या दरम्यान भाविकांना विस्तारित रस्त्यांचं जाळं उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत नाशिक रिंगरोडबाबतही मंजुरी मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीला शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ यांच्यासह आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कुंभमेळाशी संबंधित आवश्यक सूचना दिल्या. या बैठकीबाबत मंत्री गिरीश महाजन यांनीही माहिती दिली.

Kumbh Mela, Nashik, Trimbakeshwar, Devendra Fadnavis, Nitin Gadkari, Central Highways Ministry, Road Development, DPR, Mumbai, Palghar, Gujarat, Chhatrapati Sambhajinagar, Dhule, Nagpur, Nashik Ring Road, Simhastha Kumbh Mela 2027.

 #KumbhMela #Nashik #Maharashtra #DevendraFadnavis #NitinGadkari #RoadDevelopment #Infrastructure #SimhasthaKumbhMela #Pilgrimage   

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधांना गती (VIDEO) नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधांना गती (VIDEO) Reviewed by ANN news network on ६/२३/२०२५ १०:०७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".