लग्नाचे आमिष दाखवून ८.३५ लाखांचा गंडा

 


पुणे: येरवडा येथील एका महिलेची 'डिव्हॉर्स मॅट्रिमोनी' या ऑनलाइन साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून आणि 'मनी लॉन्ड्रिंग' प्रकरणात दिल्ली व पुणे एअरपोर्टवर अडकल्याचे खोटे सांगून ८ लाख ३५ हजार ७६५/- रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.

या प्रकरणी एका महिला फिर्यादीने (वय २८ वर्षे, रा. येरवडा, पुणे) तक्रार दिली आहे. आरोपी मोबाईल धारक असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

एप्रिल २०२५ ते ०२/०६/२०२५ रोजीपर्यंत ऑनलाइन माध्यमाद्वारे ही फसवणूक झाली. फिर्यादींची नमूद मोबाईल धारकाशी 'डिव्हॉर्स मॅट्रिमोनी' या साईटवर ओळख झाली. त्याने फिर्यादींना लग्नाचे आमिष दाखवून आणि पुणे येत असल्याचे खोटे सांगून, त्याला 'मनी लॉन्ड्रिंग'च्या केसमध्ये दिल्ली व पुणे एअरपोर्ट येथे पकडून ठेवल्याबाबतची बतावणी केली. त्यानंतर, फिर्यादींची ८,३५,७६५/- रुपये किमतीची आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी सायबर स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ६३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१९ (२) (विश्वासघात), ३१८ (४) (फसवणूक), ३ (५) (गुन्हेगारी कट) आणि आय.टी. अॅक्ट ६६ (डी) (संगणकाशी संबंधित गुन्हा) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक देवकाते करत आहेत.

  • -------------------------------------------------------------------------------------------------------------- 
  • Cyber Crime, Online Fraud, Matrimonial Fraud, Financial Scam, Yerwada, Pune
  •  #OnlineFraud, #MatrimonialScam, #CyberCrime, #PunePolice, #YerwadaCrime
लग्नाचे आमिष दाखवून ८.३५ लाखांचा गंडा लग्नाचे आमिष दाखवून ८.३५ लाखांचा  गंडा Reviewed by ANN news network on ६/११/२०२५ ०९:०३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".