'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींकडून जुन्नरच्या रमेश खरमाळे आणि पाटोदा ग्रामपंचायतीच्या कार्याचा गौरव

 

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ जून रोजी झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील रमेश खरमाळे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीने केलेल्या पर्यावरण रक्षणाच्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

रमेश खरमाळे: पर्यावरणासाठी समर्पित कुटुंब

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या महिन्यात अनेक उपक्रम झाले. अनेकांनी आपल्या परिसरातील पर्यावरण रक्षणासाठी एकट्याने प्रयत्न करणाऱ्या लोकांची माहिती दिली. पुणे जिल्ह्यातील रमेश खरमाळे यांनी पर्यावरण रक्षणासंदर्भात केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. जेव्हा बहुतेक लोक आठवड्याच्या शेवटी घरी आराम करणे पसंत करतात, तेव्हा रमेश खरमाळे आणि त्यांचे कुटुंबीय कुदळ, फावडे घेऊन घराबाहेर पडतात. खरमाळे कुटुंबीय जुन्नर परिसरातील डोंगरांमध्ये जाऊन जमिनीत पाणी मुरवण्यासाठी चर खणतात आणि बिया लावतात. अवघ्या २ महिन्यांत त्यांनी ७० चर खणले आहेत. खरमाळे यांनी अनेक लहान तळी तयार केली आहेत आणि शेकडो झाडे लावली आहेत. श्री. खरमाळे हे एक ऑक्सिजन पार्क देखील उभारत आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून या भागात पक्षी परतले आहेत आणि वन्यजीवनाला नवीन आयुष्य लाभले आहे.

पाटोदा ग्रामपंचायत: कार्बनमुक्त आणि स्वच्छतेचे आदर्श मॉडेल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘पाटोदा’ ही कार्बन मुक्त (कार्बन न्यूट्रल) ग्रामपंचायत आहे. या गावात कोणीही स्वतःच्या घराबाहेर कचरा फेकत नाही. प्रत्येक घरातून कचरा संकलित करण्याची चोख व्यवस्था केलेली आहे. या गावात सांडपाण्यावर प्रक्रियाही करण्यात येते आणि प्रक्रिया करून स्वच्छ केल्याशिवाय पाणी नदीत सोडले जात नाही. या गावात गोवऱ्या वापरून मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात आणि या गोवऱ्यांच्या राखेचा वापर करून दिवंगत व्यक्तीच्या नावाने झाड लावले जाते.

पंतप्रधानांनी पाटोदा ग्रामपंचायतीच्या कामाचा गौरव करताना सांगितले की, या गावात स्वच्छता राखण्यासाठी सुरू असलेले उपक्रम अनुकरणीय आहेत. नागरिकांच्या लहान लहान सवयी जेव्हा सामूहिक निर्धाराचे रूप घेतात, तेव्हा फार मोठे परिवर्तन आपोआप घडून येते, अशा शब्दांत पंतप्रधानांनी या ग्रामपंचायतीच्या योगदानाची प्रशंसा केली.


Narendra Modi, Mann Ki Baat, Ramesh Kharmale, Junnar, Patoda Gram Panchayat, Chhatrapati Sambhajinagar, Environment Protection, Water Conservation, Tree Plantation, Carbon Neutral Village, Swachhata Abhiyan, Community Effort, Prime Minister's Address

 #MannKiBaat #NarendraModi #EnvironmentProtection #Junnar #PatodaVillage #WaterConservation #TreePlantation #CarbonNeutral #SwachhataAbhiyan #CommunityEfforts #India

'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींकडून जुन्नरच्या रमेश खरमाळे आणि पाटोदा ग्रामपंचायतीच्या कार्याचा गौरव 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींकडून जुन्नरच्या रमेश खरमाळे आणि पाटोदा ग्रामपंचायतीच्या कार्याचा गौरव Reviewed by ANN news network on ६/२९/२०२५ ०९:५६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".