केसनंद येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

 


पुणे : पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील ओम निवास बिल्डिंग, तळेरानवाडी रोड, केसनंद येथे एका विवाहितेस आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती सुरज राजेंद्रप्रसाद पाठक (वय २६) याला अटक करण्यात आली आहे, तसेच सासू-सासरे आणि इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ मार्च २०२४ रोजी ते ७ जून २०२५ रोजी ००:३० वाजेदरम्यान घडली आहे. 

फिर्यादी महिलेची मुलगी स्वाती सुरज पाठक (वय २०) हिचे लग्न ६ मार्च २०२४ रोजी आरोपी पतीसोबत झाले होते. लग्नानंतर सासरी नांदत असताना, पती, सासू-सासरे आणि इतर नातेवाईकांनी आपापसात संगनमत करून, स्वातीला माहेराहून पैशांची मागणी केली. तिला टोचून बोलून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून तिने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.   

याप्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये भा.न्या.सं. कलम ८०, ११५ (२), ३ (५), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा.निरीक्षक विनायक अहिरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.   

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Crime, Suicide Abetment, Domestic Violence, Wagholi, Arrest 

#DomesticViolence #SuicideAbetment #Wagholi #PuneCrime #InLawsArrested

केसनंद येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या केसनंद  येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या Reviewed by ANN news network on ६/०९/२०२५ ०५:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".