पिंपरी चिंचवड: महाळुंगे एमआयडीसी येथील हॉटेल मोनिका समोर, चाकण ते वांद्रा रोडवर एका टाटा डंपरने मोटारसायकलला धडक दिल्याने २७ वर्षीय मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे.
या प्रकरणी फिर्यादी गोरक्षनाथ काळुराम घावटे (वय ३० वर्ष, धंदा शेती, रा. भांबोली, स्पार्कमिंडा कंपनीचे बाजूला, ता. खेड, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी कानिफराव दिगंबर बोंबले (वय ३४ वर्ष, मूळगाव जावराला, ता. उमरखेड, जि. यवतमाळ, सध्या रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
दि. १०/०६/२०२५ रोजी सकाळी ११:४५ वाजण्याच्या सुमारास मौजे भांबोली गावच्या हद्दीत, हॉटेल मोनिका समोर, चाकण ते वांद्रा जाणारे रोडवर, ता. खेड, जि. पुणे येथे हा अपघात घडला. आरोपी कानिफराव बोंबले याने त्याच्या ताब्यातील टाटा डंपर वाहन (नंबर एम.एच.१४/एल.एच.९९८०) हयगयीने, अविचाराने, रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वराळे गाव बाजुकडून वासुली गाव बाजुकडे चालवले. त्याने त्याच्या समोर वासुलीकडे जाणाऱ्या मोटारसायकल (नंबर एम.एच.१२/एन.एस.६८४७) ला पाठीमागून धडक दिली.
या धडकेमुळे मोटारसायकलस्वार गणेश बाळु जाधव (वय २७ वर्ष, मूळगाव कुरकुंडी, ता. खेड, जि. पुणे) यास डोक्यास, हातास, पायांस गंभीर दुखापती होऊन त्याचा मृत्यू झाला. तसेच, वाहनाचेही नुकसान झाले आहे.
या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ३६५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१ (सार्वजनिक ठिकाणी बेदरकारपणे वाहन चालवणे), १०६ (अपघाती मृत्यू), १०४ (गंभीर दुखापत), ३२४ (शस्त्राने दुखापत) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ (रॅश ड्रायव्हिंग), १३४ (अ) (ब) (अपघात झाल्यावर मदत न करणे व माहिती न देणे) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास उपनिरीक्षक परदेशी करत आहेत.
- -------------------------------------------------------------------------------------------------------------- Accident, Fatal Accident, Arrest, Mahalunge MIDC, Pimpri Chinchwad, Road Safety
- #FatalAccident, #RoadAccident, #MahalungeMIDC, #PimpriChinchwad, #Arrest
Reviewed by ANN news network
on
६/११/२०२५ ०८:३९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: