रविवार, १ जून, २०२५

रावेतमध्ये गुंतवणूकदाराची मोठी फसवणूक



रावेत: रावेत येथे एका ३७ वर्षीय व्यक्तीची ४७,४४,५००/- रुपयांची गुंतवणूक फसवणूक झाली आहे.

  अज्ञात मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिक पैसे मिळवण्याचे आमिष देण्यात आले. K-6 Nuvama Wealth Group नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगितले. पैसे काढण्याची मागणी केल्यावर २०% कमिशन आणि टॅक्स भरावा लागेल असे सांगून आणखी पैसे उकळण्यात आले.

  आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे तपास करत आहेत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

 #CyberCrime #InvestmentFraud #Pune #FinancialCrime #Ravet

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा